Weather : यंदाच्या हिवाळ्यात थंडीचा (cold weather) जोर कमी असणार आहे. डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान किमान तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. डिसेंबरमध्ये देशातील बहुतांश भागात सामान्यपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं सामान्यपेक्षा थंडीच्या लाटा यंदाच्या हिवाळ्यात कमी दिवस पाहायला मिळतील असं भाकित भारतीय हवामान विभागानं केलं आहे.

थंडी कमी राहण्याचं नेमकं कारण काय?

उत्तरेकडील काही भाग आणि मध्य भारतातील काही भागात किमान तापमान सरासरी राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या, विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरावर एल निनोचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळं मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या बहुतेक भागांमध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. यंदाच्या हिवाळ्यात एल निनो अधिक प्रभावी स्थितीत कायम राहण्याची शक्यता आहे. हिंदी महासागरावर पॉझिटिव्ह आयओडी आहे. मात्र, वर्षाच्या शेवटाला तो न्यूट्रल होण्याची परिस्थिती आहे. त्यामुळं यंदा थंडी कमी असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

सध्या थंडीचे (Winter) दिवस आहेत. मात्र, वाट पाहत असलेल्या ठिकाणी पावसाची हजेरी लागली आहे. देशभरात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पाहायला मिळाला आहे. आजही राज्यासह देशात पावसाची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) पाहायला मिळत आहे. तर काही भागात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान केलं आहे.

अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका

अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वर्षभर मेहनत करून तयार केलेली पीक अवकाळी पावसामुळे शेतातच कोलमडून पडली आहेत. त्यामुळे या शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न उपस्थित केला. अनेक ठिकाणी फळबागांना देखील फटका बसला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पृथ्वीचं वाढतं तापमान हे अवकाळी पावसाला कारणीभूत असल्याचे डख म्हणाले. भविष्यात अवकाळी पावसाला, गारपीटीला सामोर जावं लागणार आहे. हवेचं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं अशी स्थिती निर्माण होते.

महत्त्वाच्या बातम्या:

राज्यात अवकाळीचा जोर राहणार की उघडणार? उद्यापासून हवामानाची स्थिती काय राहणार? सविस्तर माहिती एका क्लिकवर

from Morning Headlines 1st December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News https://ift.tt/bkaq4Lp
https://ift.tt/L2zkuic
यंदा हिवाळ्यात थंडीचा जोर कमी राहणार, नेमकं कारण काय? भारतीय हवामान विभागानं दिली सविस्तर माहिती
December 01, 2023
0
Tags