ABP Cvoter Exit Poll Telangana Result 2023: तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 च्या एक्झिट पोलमध्ये (Exit Poll Telangana Result) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या भारत राष्ट्र समितीला (BRS) मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, बीआरएससोबत राज्य विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस मुस्लिमीनला (AIMIMI) किती जागा मिळणार? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच तेलंगाणाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसी यांची ऑल इंडिया मजलिस मुस्लिमीनला सत्ता काबीज करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच एक्झिट पोलमधून समोर आलेली आकडेवारी खरंच धक्कादायक आहे.

तेलंगणातील 119 जागांपैकी AIMIM नं नऊ जागांवर आपलं नशीब आजमावलं आहे. बहुतांश निवडणुकांमध्ये पक्षाला बहुतांश जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. इंडिया टीव्हीच्या सीएनएक्स पोलनुसार, एआयएमआयएमला पाच ते सात जागा मिळताना दिसत आहेत. तर, 'जन की बात' पोलमध्ये पक्षाला चार ते सात जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिझ (Matrize) पोलमध्ये एआयएमआयएमला 5 ते 7 मतं मिळण्याची शक्यता आहे. TV-9 Bharatvarsh TV9-Pollstrat च्या पोलनुसार, पक्षाला 6 ते 8 जागा मिळू शकतात. याशिवाय टाईम्स नाऊ-ईटीजीच्या एक्झिट पोलमध्ये एआयएमआयएमला 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.

तेलंगणात कोणाला किती जागा मिळणार?

तेलंगणातील 119 जागांपैकी काँग्रेसला 49 ते 65 जागा मिळू शकतात. तर बीआरएस 38 ते 54 जागा जिंकू शकते. तसेच, भाजपला 5 ते 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय AIMIM 5 ते 9 जागा जिंकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या तेलंगणात राजकीय समीकरण काय?

तेलंगणात यापूर्वी 2018 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये तेलंगणा राष्ट्र समितीला (सध्याची भारत राष्ट्र समिती) 88 जागांवर विजय मिळाला होता. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्त्वात तेलंगणात बीआरएसनं सरकार स्थापन केलं. बीआरएसनंतर निवडणुकीत सर्वाधिक मतं काँग्रेसला मिळाली होती. काँग्रेसनं 19 जागा जिंकल्या होत्या. भाजपला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला होता. तर असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम 7 जागांवर, तर तेलगू देसमला 2 जागांवर विजय मिळाला होता.

काँग्रेस आणि बीआरएसमध्ये खरी चुरस रंगण्याची शक्यता

राजकीय विश्लेषकांच्या मते तेलंगणामध्ये आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि बीआरएस यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. बीआरएस सध्या तेलंगणामध्ये सत्तेत आहे, तर काँग्रेसनं बीआरएसला पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसनं गेल्या काही दिवसांपासून तेलंगणामध्ये वर्किंग कमिटीच्या महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन केलं होतं. याव्यतिरिक्त इथे बीआरएस आणि काँग्रेस यांच्यात पोस्टर वॉरही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

कोणत्या राज्यात कधी झालंय मतदान? (Five State Voting & Counting Dates)

मिझोराम : 7 नोव्हेंबर रोजी मतदान (Mizoram Voting Date)
छत्तीसगड : 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Chhattisgarh Voting Date)
मध्यप्रदेश : 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Madhya Pradesh Voting Date)
राजस्थान : 23 नोव्हेंबर रोजी मतदान (Rajasthan Voting Date)
तेलंगाणा : 30 नोव्हेंबर रोजी मतदान

from Chhattisgarh Exit Poll 2023 Result : छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर, काँग्रेसला सत्ता राखताना दमछाक! https://ift.tt/aihx9S7
https://ift.tt/qD7918v
असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM ला तेलंगणात किती जागा मिळतील? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज
November 30, 2023
0
Tags