China On India-US Relations: चीन (China) सरकारच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रामध्ये एक लेख छापण्यात आला आहे. या लेखामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अमेरिकेच्या (America) दौऱ्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत भारताला इशारा देखील देण्यात आला आहे. तर या वृत्तपत्रामध्ये चीनने स्पष्टपणे भारताला (India) अमेरिकेपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

चीनच्या विरोधात भारत अमेरिकेच्या जवळ जात असल्याचा दावा देखील या वृत्तपत्रामध्ये करण्यात आला आहे. तसेच अमेरिका त्याच देशांशी संबंध ठेवते ज्या देशांमुळे त्यांना फायदा होणार आहे, नाहीतर अमेरिकेला पाठीत वार करण्याची सवय आहे असं देखील या वृत्तपत्रामध्ये स्पष्टपणे मांडण्यात आले आहे.

चीनचे अमेरिकेवर गंभीर आरोप

चीनच्या सरकारने या वृत्तपत्रामध्ये म्हटलं आहे की, अमेरिका इतर देशांच्या सद्भावनेच्या बळावर महासत्ता बनलेली नाही, तर इतर देशांना धमकावून ती इथपर्यंत पोहोचली आहे. तसेच अमेरिका चीनला घाबरत आहे त्यामुळे तो मदतीसाठी इतर देशांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील यामध्ये लिहिण्यात आलं आहे.

तर जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाहीचा संदर्भ देऊन अमेरिका अपप्रचार करत असल्याचा दावा देखील या वृत्तपत्रामध्ये करण्यात आला आहे. तर अमेरिका हा भारतासाठी योग्य नाही कारण भारत अमेरिकेच्या सर्व ध्येयांना पूर्ण करु शकतो आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींचे एवढ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे, असं देखील या वृत्तपत्रामध्ये म्हटलं आहे.

खरंतर भारत आणि अमेरिकेमध्ये चीनशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी दोन्ही देशांनी हिंदी आणि प्रशांत महासागरात चीनच्या वाढत्या धोक्याविषयी तसेच दहशतवादावर पाकिस्तानची भूमिका आणि रशिया - युक्रेनमधील युद्धासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की, 'जागतिक व्यवस्था ही संयुक्त राष्ट्रांच्या नियामांचा सन्मान करणे, वादावर शांतीपूर्ण समाधान मिळवणे, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर यावर आधारित आहे.'

त्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील या संबंधामुळे आता चीन चांगलाच अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच भारत आणि अमेरिकेच्या या वाढत्या संबंधामुळे चीन मात्र चांगलाच अडचणीत येणार असल्याचं देखील यावरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता या जागतिक राजकारणावर नेमका कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/vf7ZmDQ Modi US Visit : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यामुळे भारताला फायदा, अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक, गुगल-ॲमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्यांची घोषणा

from india https://ift.tt/PMtjDKy
https://ift.tt/WKaLbtu
China On India-US Relations: अमरक आण भरतचय सबधमळ चन असवसथ अमरकपसन दर रहणयच भरतल दल इशर
June 25, 2023
0