1983 World Cup Win:  भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा क्षण म्हणजे 1983 साली भारताने जिंकलेला विश्वचषक (World Cup ) संपूर्ण भारत (India) आजही ज्या गोष्टींचा अभिमान बाळगतो त्यामधलीच ही एक गोष्ट. तेव्हा संपूर्ण जगालाच काय भारताला देखील ही आशा नव्हती की त्या विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं जाईल. पण या सगळ्यामध्ये भारतासाठी खऱ्या अर्थाने तो देव ठरला होता. तो म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव.

खरंतर कपिल देव यांच्या खेळीचा भारताच्या या यशामध्ये अगदी मोलाचा वाटा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कपिल देव यांनी क्रिकेटच्या इतिहासात विक्रम रचला होता. समोर झिम्बाबेसारखा संघ. खरंतर त्या काळी झिम्बाबे संघांचं देखील क्रिकेटमध्ये चांगलचं वजन होतं. पण त्यादिवशी कपिल देव यांनी झिम्बाबेच्या खेळाडूंना धू-धू धुतलं आणि भारतीय किक्रेट संघांचं नाव जगाच्या यादीत कोरलं गेलं. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांनी 175 धावांचा ऐतिहासिक खेळी केली होती आणि त्यानंतर तो क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. या दिवशी कपिल देव हे एकदिवसीय सामन्यामध्ये 100 धावांची खेळी खेळणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले होते.

झिम्बाबेचा सामना जिंकणं भारतासाठी महत्त्वाचं होतं

खरंतर ती भारतासाठी करो या मरो ची खेळी होती. अगदी 17 धावा करुन भारताचा निम्मा संघ माघारी फिरला होता. त्यामुळे भारतीयाचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न आताही अपूर्णच राहणार असाच सगळ्यांचा समज झाला होता. पण त्यावेळी कर्णधार कपिल देव यांनी अगदी संयमाने खेळी केली आणि त्यांना मोलाची साथ मिळाली ते रॉजर बिन्नी याची. या जोडीने 48 चेंडूमध्ये 22 धावांची भागिदारी केली. त्यावेळी कपील देव यांनी 138 धावांमध्ये 175 धावा केल्या. भारताने झिम्बाबे समोर 267 धावांचं आव्हान ठेवलं आणि 31 धावांनी झिम्बाबेवर विजय मिळवला. त्यामुळे विश्वचषकाच्या दिशेने भारताचा महत्त्वपूर्ण प्रवास सुरु झाला होता.

आणि भारतासमोर इंग्लंडचं आव्हान

भारतानं झिम्बाबेवर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता. इंग्लंडसोबत 22 जून रोजी भारतीय संघ उपात्यं फेरीचा सामना खेळत होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा इंग्लंडने चक्क 60 षटकांमध्ये 213 धावा केल्या होत्या. त्यादिवशी देखील कपिल देव यांच्या कामगिरीमुळे भारतीयांच्या हृदयात कोरणार तो दिवस ठरला. कपिल देव यांनी 3 विकेट्स घेत संघाला विजयाच्या दिशेने नेलं. त्यांना संघातील इतर खेळाडूंची देखील तितकीच मोलाची साथ मिळाली. त्या खेळात भारताने अवघ्या काही षटकात विजय मिळवला होता. भारताच्या फलदांनी जोरदार कामगिरी करत अंतिम फेरीत दमदार प्रवेश मिळवला होता.

एक झेल आणि भारताचा ऐतिहासिक क्षण

भारतासमोर विडींज आव्हान. खरंतर भारत अंतिम फेरीत पोहचला हिच भारतीयांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती. लॉर्ड्सच्या मैदावर भारताच्या सुपुत्रांनी सुवर्णक्षण घडवला होता. विश्वचषकात तोपर्यंत फक्त वेस्ट इंडिजनेच दोनदा विश्वकप जिंकून क्रिकेटच्या विश्वात आपलं स्थान मजबूत केलं होतं. परंतु त्यानंतर भारताने त्यांचं सलग तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचं स्वप्न मात्र अपूर्णच ठेवलं.

वेस्ट इंडिजच्या संघाला अवघ्या 183 धावांचं लक्ष दिलं होतं आणि 140 धावांमध्ये भारताच्या शिलेदारांनी तो डाव गुंडाळला होता. जगातील फलंदाजांच्या यादीमध्ये मानाचं स्थान असलेले विवियन रिचर्ड्स मैदानावर होते. तुफान फटकेबाजी लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु होती आणि त्या एका झेलाने संपूर्ण डावच पालटला. विवियन रिचर्ड्स यांनी एक जोरदार शॉट मारला आणि कपील देव यांनी दूरचं अंतर गाठत चेंडू झेलला.

त्या दिवसाचं भारतीय क्रिकेटविश्वातच नाही तर प्रत्येक भारतीयाच्या मनात मानाचं आणि आदराचं स्थान आहे. आज त्या ऐतिहासिक दिवसाला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. पण आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात तो क्षण जशाच्या तसा आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/tbnhmgQ World Cup Win : भारताच्या ऐतिहासिक कामगिरीला 40 वर्ष पूर्ण! आजच्या दिवशी विश्वचषक उंचावून रचला होता इतिहास

from india https://ift.tt/tkJzE9M
https://ift.tt/WKaLbtu
1983 World Cup Win: ... आण त तयदवश खऱय अरथन भरतय करकटच 'दव' ठरल! भरतल वशवचषक मळवन दणयत कपल दव यच मलच वट
June 25, 2023
0