Type Here to Get Search Results !

Weather Update : नवीन वर्षात थंडीचा जोर वाढणार, का वाढतेय हुडहुडी? वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update News : देशात सातत्यानं वातावरणात बदल (Climate change) होत आहे. कधी थंडीचा कडाका (Cold Weather) तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. तर काही ठिकाणी पाऊस (Rain) देखील पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या देशातील अनेक भागात थंडीचा कडा वाढला आहे. विशेषत: उत्तर भारतात (North India) तापमानाचा (Temperature) पारा कमालीचा घरसला आहे. दिल्लीत (Delhi) तापमानाचा पारा घसरल्यामुळं थंडीत चांगलीच वाढ झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही (Maharashtra) हुडहुडी वाढली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 15 ते 20 अंशाच्या आसपास आहे.

का होतेय थंडीत वाढ?

भारतीय हवामानशास्त्र विभागानं (India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार उत्तर भारतात थंडीचा पारा (North India) आणखी वाढण्याची शक्यता आहे. हिमालयातून वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांमुळं वायव्य भारतातील मैदानी भागात किमान तापमानात घट झाली आहे. तापमान तीन ते पाच अंश सेल्सिअसने खाली आल्यानं हुडहुडी चांगलीच वाढली आहे. दिल्लीत तापमानाचा पारा हा 10 अंश सेस्लिअसच्या आसपास घसरला आहे.

नवीन वर्षात थंडीचा जोर वाढणार

दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसांत उत्तर भारतात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं नवीन वर्षात हुडहुडी आणखी वाढणार आहे. तसेच काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. वायव्य भारतात 1 जानेवारीपासून थंडीची लाट सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्लीच्या सफदरजंगमधील प्राथमिक हवामान केंद्राच्या  वेधशाळेत किमान तापमान 10.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. पुढच्या 24 तासामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर भारतीय मैदानी भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय बदल जाणवत आहे. त्यामुळं थंडी वाढणार आहे.

महाराष्ट्रातही पारा घसरला

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. थंडी वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. मराठवाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्राचा पारा चांगलाच घसरला आहे. तसेच कोल्हापूर पुणे या  जिल्ह्यात देखील थंडी वाढली आहे. दरम्यान, ही वाढती थंडी रब्बी पिकांसाठी चांगली असल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/FVJoHZ8 Update : कुठे थंडीचा कडाका, तर कुठे पावसाचा तडाखा; वाचा कोणत्या भागात काय स्थिती?

from india https://ift.tt/Ryz4Ovw
https://ift.tt/gqe7PA0

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.