Type Here to Get Search Results !

Rice Export :  भारत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार, 'या' देशांमध्ये तांदळाला मोठी मागणी

Rice Export : भारत (India) हा कृषीप्रधान देश आहे. कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा (Indian Economy) आहे. त्यामुळं शेती क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. दरवर्षी देशात मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचं उत्पादन घेतलं जातं. भारत हा तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार (Rice Export) देश आहे. भारताच्या तांदळाला जगातील अनेक देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेषत: अमेरिका, इराण, येमेनसह इतर देशांमध्ये भारताच्या तांदळाला मोठी मागणी आहे. यावर्षी तांदळाच्या निर्यातीत मोठी  वाढ झाली आहे. देशातून बासमती आणि गैर बासमती तांदळाची आत्तापर्यंत 126 लाख टन निर्यात झाली आहे.

मागदील वर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाच्या निर्यातीत वाढ

भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. भारत सर्वाधिक बासमती तांदूळ निर्यात करतो. अनेक निर्बंध असूनही, भारताने चालू आर्थिक वर्षात 126.97 लाख टन बासमती आणि गैर-बासमती तांदळाची निर्यात केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या निर्यातीत 7.37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 118.25 लाख टन तांदळाची निर्यात झाली होती. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-ऑक्टोबर या कालावधीत बासमती तांदळाची निर्यात गेल्या वर्षी 21.59 लाख टन होती. जी याच कालावधीत वाढून 24.97 लाख टन झाली आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत सुमारे 5 लाख टनांची वाढ झाली आहे. ती आधी 96.66 लाख टन होती. जी आता वाढून 102 लाख टन झाली आहे.

'या' देशांची भारतीय तांदळाला मोठी मागणी

भारत दरवर्षी विविध देशांना तादंळाची निर्यात करतो. अमेरिका, युरोप आणि सौदी अरेबियासारख्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात बासमती तांदळाची निर्यात केली जाते. बासमती नसलेला तांदूळ आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाठवला जातो. सुमारे दोन तृतीयांश बासमती तांदूळ इराण, सौदी अरेबिया, इराक, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या देशांमध्ये निर्यात केला जातो. त्या ठिकाणी भारतीय तांदळाला मोठी मागणी आहे.

खरीप हंगाम 2022-23 मध्ये उत्पादनात घट होईल

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, गेल्या खरीप हंगामातील जुलै ते जून या कालावधीत तांदळाचे उत्पादन 111.76 लाख टन होते. ते 2022-23 च्या खरीप हंगामात 1.4.99 दशलक्ष टनांपर्यंत खाली येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तांदळाच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. बिगर बासमती तांदळावर 20 टक्क्यांपर्यंत सीमाशुल्क आकारण्यात आले होते. मात्र, या सगळ्याचा बासमती तांदळाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/6NpaBf4 Export : तांदूळ निर्यातीवरील बंदी कायम, मात्र 'या' लोकांना मिळाली निर्यातीसाठी मंजूरी

from india https://ift.tt/nP8oMys
https://ift.tt/gqe7PA0

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.