Air India New CEO: टाटा समूहाने आता एअर इंडियाची धुरा कॅम्पबेल विल्सन यांच्याकडे सोपवली आहे. त्यांची एअर इंडियाचे नवे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एव्हिएशन इंडस्ट्रीचा 26 वर्षांचा अनुभव असलेल्या कॅम्पबेल विल्सन यांच्याकडे आता एअर इंडियाचे भविष्य घडवण्याची जबाबदारी असेल. कॅम्पबेल विल्सन हे यापूर्वी स्कूट एअरलाइन्सचे सीईओ होते.

कोण आहेत कॅम्पबेल विल्सन?

कॅम्पबेल विल्सन यांनी त्यांचे शालेय शिक्षण न्यूझीलंडच्या कॅंटरबरी विद्यापीठातून केले आहे. त्यांनी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर ऑफ कॉमर्सची पदवी मिळवली आहे. कॅम्पबेल विल्सन यांनी 1996 मध्ये सिंगापूर एअरलाइन्समधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ते न्यूझीलंडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी होते. नंतर कंपनीने त्यांना कॅनडा, हाँगकाँग आणि जपानमध्ये कामासाठी पाठवले. पुढे ते 2011 मध्ये सिंगापूरला परतले आणि स्कूटच्या स्थापनेपासून ते 2016 पर्यंत कंपनीचे सीईओ होते. स्कूट ही सिंगापूर एअरलाइन्सची लो-कॉस्ट सर्व्हिस देणारी उपकंपनी आहे.

यानंतर पुढे विल्सन यांनी सिंगापूर एअरलाइन्समध्ये सेल्स आणि मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम केले. तेथे त्यांनी प्राइसिंग, डिस्ट्रिब्युशन, ई-कॉमर्स, मर्चेंडाइजिंग, ब्रँड आणि मार्केटिंग, ग्लोबल सेल्स हाताळले. कंपनीने त्यांना पुन्हा एकदा एप्रिल 2020 मध्ये स्कूट एअरलाइन्सच्या सीईओ पदाची जबाबदारी दिली.

एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते म्हणाले आहेत की, ''टाटा समूहाचा एक भाग बनणे आणि एअर इंडियासारख्या ब्रँडचे नेतृत्व करणे हा त्यांच्यासाठी बहुमान आहे. एअर इंडिया आता जगातील सर्वोत्तम एअरलाइन बनण्याच्या प्रवासावर आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना जागतिक दर्जाची सेवा प्रदान करेल.''

इतर महत्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/Wi0MdUO Anthem in Madrasa: उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य, अल्पसंख्याक कल्याण अधिकारी करणार देखरेख

<a href="https://ift.tt/I7Rudox Law : 2014 ते 2020 दरम्यान देशद्रोह कायद्यांतर्गत 399 गुन्हे, दोषी सिद्ध होण्याचं प्रमाण अवघं 2.25 टक्के
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था रामभरोसे! डॉक्टर, नर्सेसच्या अनेक जागा रिक्त

from india https://ift.tt/nLaSxmd
https://ift.tt/X0jS6yW
Air India: एअर इंडियाचे भविष्य पालटणार; आता महाराजाची धुरा कॅम्पबेल विल्सन यांच्या हाती
May 12, 2022
0