होळीच्या आधीच मोदी सरकार देशातील जवळपास एक कोटी केंद्रीय कर्माचाऱ्यांना मोठं गिफ्ट देणार आहे. केंद्र सरकारकडून लवकरच महागाई भत्त्यात वाढ (7th Pay Commission DA Hike) करण्याची घोषणा होऊ शकते. पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर आणि होळी सणाच्या आधीच सरकारकडून हा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.

महागाई भत्ता किती वाढणार?

केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात जवळपास 3 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सध्या महागाई भत्ता 31 टक्के आहे. लवकरच 34 टक्के महागाई भत्ता करण्यात येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे. असा निर्णय झाल्यास कर्मचाऱ्यांच्या हाती चांगली रक्कम येऊ शकते.

पगारात किती वाढ?

केंद्र सरकारने तीन टक्के महागाई भत्ता वाढवला तरी पगारात जवळपास 20 हजार रुपयांपर्यंतची वाढ होऊ शकते. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये 3 टक्के आणि पुन्हा जुलै महिन्यात 11 टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आला होता.

समजून घ्या पगाराचे गणित

एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18 हजार रुपये असेल तर त्याला 31 टक्के महागाई भत्त्यानुसार 5580 रुपये प्रति महिना महागाई भत्ता मिळू शकतो. जर महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला तर, तो 34 टक्के इतका होईल. त्यामुळे 34 टक्क्यांच्या हिशोबाने महागाई भत्ता 6120 रुपये प्रति महिना इतका होईल.

सामान्यांचे काय?

केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जात असताना दुसरीकडे सामान्यांचे काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मागील काही महिन्यात महागाई वाढली आहे. त्यातच रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईच्या झळा आणखी तीव्र झाल्या आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/L0e8wpz Planning : पैशांचे नियोजन महत्त्वाचे; बचत करण्यासह कर्जातूनही व्हाल मुक्त!

<a href="https://ift.tt/IFO4Uad Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध: 'या' कंपन्यांनी रशियातून घेतली माघार

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

from india https://ift.tt/B75X1OE
https://ift.tt/zfmFOpt
होळीआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून गिफ्ट, घेणार 'हा' निर्णय?
March 05, 2022
0