<p>आयपीएलच्या मेगा लिलावाची वेळ अवघ्या काही तासांवर आली आहे. हा मेगा लिलाव आज आणि उद्या बंगळुरूत संपन्न होणार आहे. बीसीसीआयकडून या मेगा लिलावासाठी ५९० देशीविदेशी खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्या ५९० खेळाडूंमधल्या सर्वोत्तम पर्यायांना आपल्या ताफ्यात सामावून घेण्याचा आयपीएलमधल्या प्रत्येक फ्रँचाईझीचा प्रयत्न असेल. आयपीएलच्या रणांगणात यंदा लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या फौजा दाखल झाल्या आहेत. त्यामुळं पंधराव्या मोसमापासून आयपीएल विजेतेपदाच्या शर्यतीत दहा फ्रँचाईझी असतील. त्यामुळं मेगा लिलावाची रंगत आणखी वाढणाराय. </p>
from india https://ift.tt/zBsdAgK
https://ift.tt/7vxO08M
IPL Auction 2022: आयपीएल लिलावात ईशान किसन सर्वात महागडा ABP Majha
February 12, 2022
0