World Economic Forum Davos 2022 PM Modi Speech : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ऑनलाइन होणार्‍या पाच दिवसीय दावोस अजेंडा समिटच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जगाची परिस्थिती’ या विषयावर भाषण केले. ‘दावोस अजेंडा’ शिखर परिषद सलग दुसऱ्या वर्षी डिजिटल पद्धतीने आयोजित केली जात आहे. यावेळी 130 कोटी भारतीयांच्या वतीने मी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झालेल्या दिग्गजांचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दिली.

नरेंद्र मोदी म्हणाले, कोरोनासोबत देशाचे अर्थिक व्हिजन देखील पुढे जात आहे. भारताने एका वर्षात तब्बल 160 कोटी नागरिकांना लस दिली आहे. तर कोरोना महामारीच्या सुरुवातीला आम्ही 80 कोटी नागकिरांना विनामूल्य जेवण पुरवले. जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी मोहिम राबवणारा पहिला देश आहे.

कोरोना काळात देशाने 'वन अर्थ, वन हेल्थ नेशन या संकल्पनेला अनुसरून अनेक देशांना औषधे आणि लसी पुरवल्या आहे. ज्यामुळे अनेकांचा जीव वाचला आहे. भारत जगात औषध निर्मिती करणारा तिसरा देश ठरला आहे. तसेच देशाने जगाला आतापर्यंत अनेक सॉफ्टवेअर इंजिनिअर पुरवले आहे. भारतात 50 लाखापेक्षा अधिक सॉफ्टवेअर इंजिनिअर काम करत आहे. आज भारतात युनिकॉर्नची संख्या जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, सध्या देशात सरकारचा हस्तक्षेप कमी करून Ease of Doing Business चालना देत आहे. . भारताने कॉर्पोरेट कर दर सुलभ करून, कमी करून जगातील सर्वात स्पर्धात्मक बनवले आहे. देशात 2014 साली केवळ 100 नोंदणी केलेले शंभर स्टार्टअप होते. आज त्याची संख्या 60 हजारापेक्षा अधिक आहे. देश मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड या विचारासोबत पुढे जात आहे. आज देशातील तरुणांनी entrepreneurship एक वेगळ्या उंचीवर नेली आहे. 2014 साली देशात काही स्टार्ट-अप्स होते. आज त्यांची 60 हजारापेक्षा अधिर आहे. ज्यामध्ये 80 पेक्षा अधिक यूनीकॉर्न आहेत. त्यापैकी 40 पेक्षा अधिक 2021 साली सुरू झाले आहे.

हे ही वाचा :

<a href="https://ift.tt/3A79Lmz Election 2022: पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली, 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला होणार मतदान

<a href="https://ift.tt/3A5NlSG Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी लांबणीवर

राष्ट्रवादी-शिवसेनेची गोवा विधानसभेसाठी आघाडी होणार का? दोन्ही पक्षांची उद्या गोव्यात बैठक

from india https://ift.tt/33L0HaT
https://ift.tt/eA8V8J
WEF Davos 2022 : पंतप्रधान मोदींचा 'वन अर्थ वन हेल्थ'चा नारा; भारताने जगभरात लसी पुरवल्याचं प्रतिपादन
January 17, 2022
0