<p>उत्तराखंडचे मंत्री हरकसिंह रावत यांची भाजपने सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी केलीय. रावत यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्यानं भाजपने कारवाई केल्याचं म्हटलं जातंय. एवढंच नव्हे तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही हरकसिंह रावत यांनी मंत्रीमंडळातून बरखास्त केलंय. हरक सिंह रावत सून अनुकृतीसाठी लँसडौन विधानसभा मतदारसंघातून तिकिटाची मागणी करत होते. तसंच ते काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी करतायत अशी चर्चा सुरु असल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचं सांगितलं जातंय. भाजपने हकालपट्टी केल्यानंतर हरकसिंह रावत यांनी काँग्रेसमध्ये गेलो नाही तरी काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न करणार असं म्हटलंय. हे सांगताना त्यांना रडूही कोसळलं होतं.</p>
from india https://ift.tt/3nu3KLR
https://ift.tt/eA8V8J
Harak Singh Rawat: मंत्री हरकसिंह रावत यांची पक्षातून हकालपट्टी ABP Majha
January 17, 2022
0