Type Here to Get Search Results !

Share Market: शेअर बाजार काल कोसळला, आज सावरला ABP Majha

<p>कालच्या मोठ्या पडझडीनंतर आज शेअर बाजार काहीसा सावरल्याचं दिसून आलं. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज तेजी बघायला मिळाली. तसंच मेटल आणि आयटी क्षेत्रात चांगली खरेदी झाल्याचंही दिसून आलं. सोमवारी बाजारात झालेल्या घडामोडींमुळे म्हणजे आज बाजार सुरू होण्याआधी गुंतवणुकदार धास्तावले होते. पण सकाळच्या सत्रात शेअर बाजारात तेजी दिसून आली. सकाळी दहा वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास सेन्सेक्स ८५० अंकांनी वधारून ५६ हजार ६७२ अंकावर पोहचला होता. निफ्टीही २५२ अंकांनी वधारून १६ हजार ८६६ अंकावर पोहचला होता. आज बाजार बंद होताना सेन्सेक्स ४९७ अंकांनी वधारुन ५६ &nbsp;हजार ३१९ अंकांवर स्थिरावला तर निफ्टीही १५६ अंकांनी सुधारून १६ हजार ७७० वर बंद झाला.</p>

from india https://ift.tt/3H0Bdoq
https://ift.tt/eA8V8J

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.