Omicron Cases In India : दक्षिण आफ्रिकेत उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा भारतातील संसर्ग वाढतोय. मंगळवारी देशात 16 नवे ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 216 इतकी झाली आहे. राजधानी नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. देशातील एकूण रुग्णापैकी 60 टक्केंपेक्षा जास्त रुग्ण या दोन राज्यातील आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या 11 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 65 इतकी झाली आहे. तर जम्मू काश्मीरमध्येही ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशातील 216 रुग्णापैकी 77 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.

देशातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना कोव्हिड-19 आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सूचनांचं पत्र पाठवण्यात आलं आहे . सर्व जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ओमायक्रॉन व्हेरीयंट डेल्टा व्हेरीयंटपेक्षा तीन पट वेगाने पसरत असल्याचा वैज्ञानिकांचा अभ्यास आहे. या पत्राद्वारे राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. कन्टेन्मेंट झोन, टेस्टिंग आणि सर्वेलन्स, क्लिनिकल मॅनेजमेंट, लसीकरण आणि कोरोनासंदर्भातील नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात केंद्राने राज्यांना नाईट कर्फ्यू, मोकळ्या जागेतील सभा तसेच लग्नसमारंभ, अंत्य यात्रेवर नियंत्रण घालण्यास सांगितले आहे.

14 राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव -
महाराष्ट्र- 65
दिल्ली- 54
तेलंगाणा- 20
कर्नाटक-19
राजस्थान-18
केरळ -15
गुजरात-14
जम्मू-कश्मीर-3
ओदिशा-2
उत्तर प्रदेश-2
आंध्र प्रदेश- 1
चंडीगढ़-1
तामिळनाडू - 1
प. बंगाल-1

ख्रिसमस सेलिब्रेशन ठरू शकतं घातक
देशात एकीकडे ओमायक्रॉन व्हेरियंटचा (Omicron Variant) धोका वाढत असताना लोक ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या (New Year Celebration) तयारीला लागले आहेत. मात्र जगात काही देशांनी सतर्कता बाळगत ख्रिसमस आणि नवे वर्ष साजरं करण्यावर निर्बंध लावले आहेत. केंद्र सरकारने ख्रिसमस आणि नवं वर्ष साजरे करण्यावर निर्बंध लावले आहेत.

देशातील कोरोनाची आतापर्यंतची स्थिती
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तसात देशभरात 5 हजार 326 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 453 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबरोबरच ओमायक्रॉनचा धोका देखील वाढतोय. देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 200 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांची चिंता वाढलीय.

from india https://ift.tt/3yKBj0A
https://ift.tt/eA8V8J
ओमयक्रॉनचा संसर्ग वाढतोय; देशातील एकूण रुग्णसंख्या 216, महाराष्ट्र-दिल्लीत सर्वाधिक रुग्ण
December 21, 2021
0