RBI Governor : केंद्र सरकार (Central Government) नं आरबीआय (Reserve Bank Of India) गव्हर्नर (Governor) शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांना पुढिल तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर, 2021 रोजी संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत Appointment Commitee नं शक्तिकांत दास यांना तीन वर्षांसाठी पुन्हा आरबीआय गव्हर्नर पदावर मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असाच की, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास 10 डिसेंबर, 2021 नंतर पुढील तीन वर्षांपर्यंत म्हणजेच, डिसेंबर 2024 पर्यंत आरबीआय गव्हर्नर पदावर कायम राहणार आहेत.

अर्थ विश्वात मोठा अनुभव

सरकारनं शुक्रवारी शक्तिकांत दास यांना 10 डिसेंबर, 2021 नंतर तीन वर्षांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सराकरनं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, नियुक्तीबाबत मंत्रिमंडळ समितीने तामिळनाडू कॅडरचे माजी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी शक्तिकांत दास यांच्या पुनर्नियुक्तीला मंजुरी दिली आहे. त्यांनी 12 डिसेंबर, 2018 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) चे 25 वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता. RBI मध्ये नियुक्तीपूर्वी त्यांनी 15 व्या वित्त आयोगाचे ( Fifteenth Finance Commision) सदस्य म्हणून काम केले होते. यापूर्वी त्यांनी अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभाग आणि आर्थिक व्यवहार विभागात सचिव म्हणूनही काम केलं आहे. 8 केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यात त्यांचा थेट सहभाग होता. दास यांनी गेल्या 38 वर्षात शासनाचा मोठा अनुभव घेतला आहे आणि वित्त, कर आकारणी, उद्योग, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रांमध्ये राज्य सरकारांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.

कोण आहेत शक्तिकांत दास?

शक्तिकांत दास 1980च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे आयएएस आधिकारी आहेत. गेल्या निवृत्तीनंतर दास भारताच्या 15 व्या वित्त आयोग आणि शेरपा जी-20 मध्ये सदस्य होते. याआधी दास यांनी तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये अर्थ विभागात काम केलं आहे. दास यांनी रिझर्व्ह बँकेचं कामकाज जवळून पाहिलं आहे. 2018 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर शक्तिकांत दास यांची RBI गव्हर्नर पदी नियुक्ती करण्यात आली होती.

from india https://ift.tt/3mn1qGa
https://ift.tt/eA8V8J
RBI Governor : शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ वाढला; पुढील तीन वर्षांसाठी RBI गव्हर्नर पदी कायम
October 28, 2021
0