<p>पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं दीक्षांत संचलन आज होत आहे. एनडीएतील खडतर प्रशिक्षणानंतर एनडीए ची 141 वी तुकडी प्रत्यक्ष देशसेवेसाठी भारतीय संरक्षण दलात दाखल होणार आहे. एनडीएतील क्षेत्रपाल मैदानावर हा शानदार सोहळा संपन्न होत आहे. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे दीक्षांत संचालनाची मानवंदना स्वीकारणार आहेत. लष्करी शिस्त, सेवाभाव आणि राष्ट्रभक्तीचं दर्शन या सोहोल्यातून घडतं. लष्करी हेलिकॉफटर्स तसेच लढाऊ विमानांची सलामी हे या सोहोल्याच विशेष आकर्षण असतं। एनडीएतील प्रशिक्षणादरम्यान विशेष कामगिरी केलेल्या कडेट्स चा याप्रसंगी पदकं देऊन गौरव करण्यात येत। दीक्षांत संचालनाचा हा सोहळा कडेट्स साठी स्वप्नपूर्तीचा अनुभव असतो. इथून बाहेर पडल्यानंतर ते सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. देशवासियांसाठी हा मोठा अभिमानाचा क्षण म्हणता येईल.</p>
from india https://ift.tt/3mwwaox
https://ift.tt/eA8V8J
Pune : 141 व्या NDA तुकडीचं दीक्षांत संचलन, लष्करी शिस्त, सेवाभाव, राष्ट्रभक्तीचं दर्शन
October 28, 2021
0