NEET Result 2021: वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळं आता निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) कडून लवकरच निकाल जाहीर केला जाऊ शकतो. या परीक्षेत 16 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता निकालाची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आपला निकाल NTAची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर जाऊन पाहू शकणार आहेत.

<a href="https://ift.tt/3BtTqYi Result 2021 : मोठी बातमी... UG 2021 चा निकाल जाहीर करायला सुप्रीम कोर्टाकडून परवानगी

कसा पाहू शकाल निकाल
– NTAची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर जा.
– NEET UG 2021 Result च्या लिंकवर क्लिक करा
– तिथं आपला अनुक्रमांक किंवा मागितलेली माहिती भरा
– एंटर केल्यानंतर आपला निकाल स्क्रिनवर दिसेल

निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला अंडर ग्रॅज्युएट्स (NEET-UG) 2021 साठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. ज्याने एनटीएला निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयानं निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकेत त्रुटी असल्याचं सांगत दोन विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती. दोन विद्यार्थ्यांसाठी 16 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी ठेवता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टानं आता 16 लाख विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करायला परवानगी दिली आहे. हायकोर्टानं दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेनंतर नीट निकाल थांबवला होता. सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, 2 विद्यार्थ्यांसाठी आम्ही निकाल थांबवू शकत नाही. 16 लाख विद्यार्थी निकालाची वाट पाहात आहेत. कोर्टानं याचिका दाखल केलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मुद्यावर NTAला नोटिस जारी केली आहे. दिवाळीनंतर यावर सुनावणी होणार आहे.

हा निकाल लागण्यास होत असलेल्या उशीरामुळं एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस अशा मेडिकल पाठ्यक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला उशीर होणार आहे. याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की, त्यांना देण्यात आलेली टेस्ट बुकलेट आणि अन्सर बुकलेट मॅच करत नव्हती. या उमेदवारांनी तत्काळा निरीक्षकांच्या समोर हा मुद्दा मांडला. त्यावेळी त्यांचं म्हणणं ऐकूनही घेतलं नाही. कोर्टानं एनटीएला याचिकाकर्ता वैष्णवी भोपाले आणि अभिषेक कापसे यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचं सांगत दोन आठवड्यात त्यांचा निकाल घोषित करण्याचं सांगितलं आहे.

from india https://ift.tt/3vWsfEc
https://ift.tt/eA8V8J
NEET Result 2021: नीट परीक्षेचा निकाल लवकरच, कसा आणि कुठे पाहाल निकाल?
October 28, 2021
0