Type Here to Get Search Results !
'लिव इन रिलेशनशिप' नव्या जगाचा, जीवनशैलीचा अविभाज्य भाग : इलाहाबाद उच्च न्यायालय
प्रयागराज : इलाहाबाद उच्च न्यायालयानं मंगळवारी एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं की, 'लिव्ह इन रिलेशनशिप' जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि याला सामाजिक नैतिकतेच्या दृष्टिकोनापेक्षा वैयक्तिक स्वायत्ततेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. न्यायाधीश प्रितिंकर दिवाकर आणि न्यायाधीळ आशुतोष श्रीवास्तव यांच्या खंडपीठानं जोडप्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. याचिकाकर्त्या जोडप्यांचा आरोप आहे की, मुलींचे कुटुंबीय त्यांच्या दैनंदिन जीवनात ढवळाढवळ करत आहेत. यासंदर्भात एक याचिका कुशीनगरच्या शायरा खातून आणि त्यांच्या जोडीदारानं दाखल केली होती. तर दुसरी याचिका मेरठमधील जीनत परवीन आणि त्यांच्या जोडीदारानं दाखल केली होती.
याचिकेत जोडप्यांनी या गोष्टीचाही उल्लेख केला आहे की, त्यावेळी त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता, परंतु, पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची काहीही मदत केली नाही. जोडप्यांनी दावा केला आहे की, त्यांचा जीव आणि स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. न्यायालयानं म्हटलं आहे की, 'लिव्ह इन रिलेशनशिप' जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत आणि यावर सुप्रीम कोर्टानंही मोहोर लावली आहे. 'लिव्ह इन' रिलेशनशिपकडे भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अन्वये जगण्याच्या अधिकारानं दिलेल्या वैयक्तिक स्वायत्ततेच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, सामाजिक नैतिकतेच्या दृष्टिकोनातून नाही."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मुंबै बँकेची चौकशीविरोधातली याचिका हायकोर्टानं फेटाळली, प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं
<a href="https://ift.tt/3pPmW8K Khan : आर्यन खान जामीनावर कसा सुटला? जाणून घ्या शेवटच्या दिवशी काय युक्तीवाद करण्यात आला
from india https://ift.tt/3Bke39r
https://ift.tt/eA8V8J
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.