<p>Toyota Car : टोयोटा नंबर वन कार कंपनी ; फोक्सवॅगन समूह दुसऱ्या क्रमांकावर टोयोटा ही कार कंपनी सलग चौथ्या वर्षी जगात अव्वल ठरली आहे. गाड्यांची विक्री या निकषावर टोयोटाचा पहिला नंबर लागला आहे. टोयोटानं २०२३मध्ये जगभरात १ कोटी १८ लाख गाड्यांची विक्री केली. यामध्ये लेक्सस या कंपनीचा देखील समावेश आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर फोक्सवॅगन हा बलाढ्य समूह आहे. फोक्सवॅगननं गेल्या वर्षात ९२ लाख गाड्यांची विक्री केली. २०२२मध्ये फोक्सवॅगनचा खप तुलनेनं कमी झाला होता. कोरोनामुळे कच्चा माल कारखान्यापर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी हे त्यामागचं प्रमुख कारण होतं. मात्र २०२३मध्ये या सर्व अडचणी दूर झाल्यानं फोक्सवॅगनची विक्री तब्बल १२ टक्क्यांनी वाढली. ऑडी, पोर्श, स्कोडा, बेंटली, स्कानिया, सीट आणि दुकाती हे सर्व ब्रँड्स फोक्सवॅगन समूहाच्या मालकीचे आहेत. </p>
from Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक, तीन जवान शहीद तर 13 जण जखमी https://ift.tt/qY3gzZp
https://ift.tt/ClXtdN3
Toyota Car : टोयोटा नंबर वन कार कंपनी ; फोक्सवॅगन समूह दुसऱ्या क्रमांकावर
January 30, 2024
0
Tags