मुंबई : भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) टप्पा आसाममध्ये पोहचताच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधींच्या टीकेला आता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. गांधी कुटुंबच देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं.

पुढे त्यांनी म्हटलं की, गांधी कुटुंब हे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. ही राहुल गांधींची ‘न्याय यात्रा’ नसून ‘मियाँ यात्रा’ आहे. जिथे जिथे मुस्लिम आहेत तिथे ते जातात. 'मियां' हा मूलतः आसाममधील बंगाली भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे.

राहुल गांधी यांनी काय म्हटलं होतं?

काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत या संदर्भात भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, जेवढं प्रेम आम्हाला मणिपूर आणि नागालँडच्या लोकांकडून मिळालं. आमच्या या यात्रेचा मुख्य उद्देश हा तुमच्या अडचणी, तुमचे प्रश्न आणि तुमच्यावर होत असलेल्या अन्याय जवळून समजावून घेण्यासाठी आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांवर बोलताना त्यांनी म्हटलं की, कदाचित देशातलं सर्वात भ्रष्ट सरकार आणि सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री हे या राज्यांत आहे.

राहुल गांधींचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

राहुल गांधी यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, आसाम सरकार हे भाजपच्या रूपाने द्वेषाच्या खतातून जन्माला आलेले भ्रष्टाचाराचे पीक आहे. आसामचे मुख्यमंत्री हे भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, ज्यांचे काम केवळ द्वेषाच्या नावाखाली जनतेचा पैसा लुटणे आहे. पैशाची ताकद आसामच्या लोकांच्या शक्तीला कधीही पराभूत करू शकत नाही. आपल्याला या अन्यायाविरुद्ध लढायचे आहे आणि असा आसाम निर्माण करायचा आहे जिथे प्रत्येक हाताला रोजगार आहे आणि ज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वैभव नेहमीच समृद्ध राहते.

असम पहुंच कर उतना ही प्यार मिला जितना मणिपुर और नागालैंड के लोगों से मिला था।

हमारी इस यात्रा का लक्ष्य आपकी पीड़ा, आपके मुद्दों और आपके साथ हो रहे भयंकर अन्याय को करीब से समझना है।

असम सरकार भाजपा रूपी ‘नफ़रत की खाद’ से उपजी ‘भ्रष्टाचार की फसल’ है।

असम का मुख्यमंत्री… pic.twitter.com/WXPKJaFPFQ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 18, 2024

हेही वाचा :

<a href="https://ift.tt/dIUp8TB Gandhi : आसाममध्ये राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'विरोधात तक्रार दाखल, मार्गात बदल केल्यामुळे आसाम पोलिसांची कारवाई

from Ayodhya:अयोध्येत मल्टी लेव्हल पार्किंग,फूड कोर्टचं व्यवस्थापन, पुण्याच्या उद्योजकाकडे मोठी जबाबदारी https://ift.tt/skEOuT1
https://ift.tt/AcSvk54
Himanta Biswa Sarma On Rahul Gandhi: गांधी परिवारच सर्वात भ्रष्ट, राहुल गांधींच्या टिकेवर आसामच्या मुख्यमंत्र्यांचा पलटवार
January 18, 2024
0
Tags