Type Here to Get Search Results !

Elon Musk : ईलॉन मस्कची लवकरच भारतात एन्ट्री, 'या' कंपनीला मिळणार परवाना; जिओ आणि एअरटेलशी थेट स्पर्धा

Starlink in India : टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ईलॉन मस्कच्या (<a href="https://ift.tt/8AE41p5 Musk) आणखी एका कंपनीची लवकरच भारतात एन्ट्री होणार आहेत. ही एंट्री टेस्लामार्फत नसून सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंकच्या (Starlink) माध्यमातून होणार आहे. स्टारलिंकला लवकरच नियामक मान्यता मिळणार असल्याचे मानले जात आहे. याबाबतचा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. परवाना मिळताच कंपनी भारतात काम सुरू करेल. स्टारलिंकच्या आगमनाने दुर्गम भाग आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटीची स्थिती सुधारू शकते.

शेअर होल्डिंग पॅटर्नची माहिती देणार (Starlink in India News)

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, ईलॉन मस्कची स्टारलिंक आपल्या शेअरहोल्डिंग पॅटर्नची माहिती उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागासमोर देणार आहे. यानंतर त्याच्या कंपनीला दूरसंचार विभागाकडून (DoT) ऑपरेटिंग प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर दूरसंचार विभागाकडून दूरसंचार सचिव नीरज मित्तल आणि संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले जाईल. मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर, सॅटेलाइट कम्युनिकेशन्स विंगद्वारे स्टारलिंकला एक मान्यता पत्र जारी केलं जाईल.

वनवेब आणि रिलायन्स जिओला आधीच परवाना (OneWeb)

स्टारलिंकने 2022 मध्ये सॅटेलाइट सर्व्हिसेस (GMPCS) द्वारे ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन्ससाठी अर्ज केला होता. मंजुरी मिळाल्यानंतर वनवेब आणि रिलायन्स जिओनंतर हा परवाना मिळवणारी ती तिसरी कंपनी ठरेल.

स्टारलिंकचा वेग किती असेल? (Internet Speed Of Starlink)

स्टारलिंक त्याच्या ग्राहकांना 25 ते 220 Mbps पर्यंत डाउनलोड गती प्रदान करते. त्यांचा अपलोड स्पीड सुमारे 5 ते 20 एमबीपीएस असल्याचा दावा कंपनीने केला आहे. स्टारलिंक वेबसाइटचा दावा आहे की बहुतेक ग्राहक 100 Mbps पेक्षा जास्त डाउनलोड स्पीडचा आनंद घेत आहेत. सध्या भारतातील दुर्गम भागात टॉवर्सच्या ऑप्टिकल फायबरद्वारे एवढा वेग मिळणे अवघड आहे. स्टारलिंक उपग्रहाद्वारे इंटरनेट पुरवत असल्याने ते 5G ऐवजी 4G गती प्रदान करण्यास सक्षम असेल अशी अपेक्षा आहे.

सेवेची किंमत इतकी असू शकते

स्टारलिंकने सध्या भारतासाठी दर निश्चित केलेले नाहीत. पण हाती आलेल्या एका अहवालानुसार, त्याची किंमत पहिल्या वर्षी सुमारे 1.58 लाख रुपये आणि दुसऱ्या वर्षी 1.15 लाख रुपये असू शकते. त्यावर 30 टक्के करही भरावा लागणार आहे. यामध्ये उपकरणाची किंमत 37,400 रुपये असून दरमहा 7,425 रुपये आकारले जाऊ शकतात.

ही बातमी वाचा:

<a href="https://ift.tt/AaCqyX4 Tax : मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या प्रत्यक्ष कर संकलनात 160 टक्क्यांची वाढ, ITR 105 टक्क्यांनी वाढला

from Ayodhya Special Report:अयोध्येत तीन लाख भाविक दाखल;अधिकाऱ्यांवर का संतापले योगी आदित्यनाथ ? https://ift.tt/znvFjqf
https://ift.tt/ovKF6HP

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.