Type Here to Get Search Results !

Weather Update : पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता, IMD ने वर्तवला अंदाज

<a href="https://ift.tt/6qlOScZ Update Today : देशात सध्या थंडीत (Winter) पावसाळा पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट पाहायला मिळत आहे, तर दक्षिण भारतात पावसाची रिमझिम सुरु आहे. याशिवाय पर्वतीय भागात पावसासह बर्फवृष्टी पाहायला मिळत आहेत. बर्फवृष्टीमुळे पर्यटक काश्मीर खोऱ्यात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पोहोचले आहेत .दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानावर परिणाम होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

देशभरातील तापमानात कमालीची घट

उत्तर भारतात तापमानात कमालीची घट झाली आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. दिल्लीत दाट धुक्यासाठी आयएमडीकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरल्यामुळे अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. यासोबततच हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला असून उड्डाणे उशिराने सुरु आहेत. पंजाब, दिल्ली आणि हरियाणामध्ये आजही दाट धुक्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेत या राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

IMD ने काय म्हटलंय?

भारतीय हवामान विभाग (IMD) ने 2 जानेवारीपर्यंत उत्तर भारतातील राज्यांमध्ये सतत दाट ते दाट धुके राहण्याची शक्यता वर्तवली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या काही भागात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 2 जानेवारीपर्यंत धुक्याच्या स्थिती कायम राहण्याचे संकेत दिले आहेत. दाट धुक्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे विमान आणि रेल्वे सेवा दोन्ही उशिराने धावत आहेत.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 3 ते 4 दिवसांत वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशाच्या हवामानात बदल होऊन काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम आणि लगतच्या मध्य भारताच्या काही भागात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, राजस्थानमध्ये पुढील तीन ते चार दिवसात पावसाची शक्यता आहे. यासोबतच 30 डिसेंबर ते 1 जानेवारी 2024 पर्यंत तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

आज राजस्थानच्या विविध भागात दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान उत्तर-पश्चिम आणि लगतच्या मध्य भारतात हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

from ...तर भारताची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलर होणार, उदय कोटक यांनी सांगितल्या 'या' 7 सूचना https://ift.tt/3BJ9lWZ
https://ift.tt/BJAIWSH

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.