Job In Indian Railways :  तुम्ही दहावी उत्तीर्ण करून आयटीआयचे प्रशिक्षण (ITI) घेऊन नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भारतीय रेल्वेत नोकरीची (Indian Railway Jobs) सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वे विभागाने (Western Central Railway Zone) 3000 हून अधिक रिक्त पदांसाठी नोकरी भरती सुरू केली आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणार्थींसाठी 3015 जागा आहेत. रेल्वेच्या विविध विभागासाठी प्रशिक्षणार्थींची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयटीआय केल्यानंतरही नोकरीची संधी मिळत नसलेल्या आयटीआय विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे.
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थीच्या परीक्षेसाठी अर्ज शुल्क रुपये 100 + रुपये 36 प्रक्रिया शुल्क म्हणजेच 136 रुपये आहे. तथापि, SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांना केवळ 36 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. अर्जाची फी ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल. 15 डिसेंबर 2023 पासून अप्रेंटिसशिप भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2024 आहे.
ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी वयोमर्यादा
- किमान वय 15 वर्ष
- कमाल वयाची मर्यादा 24 वर्ष
- आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादा सवलत लागू असेल.
ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी शैक्षणिक पात्रता किती?
ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी, उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेली असावी आणि ज्या ट्रेडमध्ये NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून शिकाऊ प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यामध्ये ITI केलेले असावे.
निवड प्रक्रिया कशी होणार?
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी निवड गुणवत्तेच्या आधारावर होईल. दहावी परीक्षेतील सरासरी गुण आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल.
अर्ज कसा करावा?
इतर महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/vkIUlhe Navy Recruitment 2023 : भारतीय नौदल 910 पदांवर भरती, येथे दाखल करा अर्ज; पात्रता जाणून घ्या
from 10000 रुपयापासून व्यवसायाची सुरुवात, आता 15.65 लाख कोटींची संपत्ती; ना अंबानी ना अदानी…या अब्जाधीशाची गोष्ट आहे वेगळी https://ift.tt/2G4w9ag
https://ift.tt/6twbkYU
Indian Railway Jobs : दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, 3000 हून अधिक जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर
December 17, 2023
0
Tags