Gautam Navlakha :  शहरी नक्षलवाद प्रकरणी आणि महाराष्ट्रातील भीमा-कोरेगाव मधील हिंसाचार प्रकरणी जामिनावर सुटका झालेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलाखा (Gautam Navlakha) यांच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांचे विशेष पथक (Delhi Police Special Cell) नवी मुंबईत दाखल झाले आहे. नवलाखा वास्तव्य करत असलेल्या आग्रोळी गावात हे पथक दाखल झाले.

काही दिवसांपूर्वी नवलाखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्याआधी नवलखा यांना नवी मुंबईतील घरात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नजरकैदेत ठेवण्यात आलं होते. त्यानंतर आज पोलिसांच्या नजरकैदेत असलेले आरोपी गौतम नवलखाची दिल्ली पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांची विशेष सेल गौतम नवलखाची चौकशी करत आहे.

दिल्ली पोलिसांची विशेष टीप नवी मुंबईत दाखल झाली असून आग्रोळी गावात गौतम नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस चौकशी करणार आहेत. चिनी फंडिंग आणि सैयद गुलाम नबी फई यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत दिल्ली पोलीस चौकशी करणार आहेत.

नवलाखांचा माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप

नवलखा हे बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे सदस्य असल्याचा आरोप आहे. शहरी नक्षलवाद प्रकरणात नवलखा यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यातून तपासयंत्रणांनी अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली होती. कागदपत्रांवरुन नवलखा माओवाद्यांच्या गुन्ह्यात आणि कटकारस्थानातही सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी म्हटले होते. काश्मिर मुक्त संघटनेचा सय्यद गुलाम नबी फई याच्यासोबत नवलखा यांचे संबंध असल्याचा आरोपही एनआयएनं केला आहे.

मुंबई हायकोर्टाकडून जामीन

गौतम नवलाखा यांना काही दिवसांपूर्वीच मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला होता. एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. या जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरीता 6 आठवडे स्थगितीची NIA ने मागणी केली आहे. मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी अंशतः मान्य करून अंमलबजावणीसाठी तीन आठवड्यांची स्थगिती दिली.

from PHOTO: वंदे भारत एक्सप्रेसने देवेंद्र फडणवीस यांनी केला प्रवास https://ift.tt/LncwTvb
https://ift.tt/5uPJQtq
Gautam Navlakha : गौतम नवलखाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांची विशेष टीम नवी मुंबईत दाखल; चिनी फंडिंगबाबत चौकशी?
December 30, 2023
0
Tags