Type Here to Get Search Results !
Mahadev App Banned: केंद्र सरकारचं मोठं पाऊल, महादेव बुक अॅपसह 22 बेटिंग अॅप्लिकेशन्सवर बंदी
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थातच ईडीच्या (ED) विनंतीवरून केंद्र सरकारने महादेव बेटिंग अॅपवर (Mahadev Betting App) बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने  महादेव बुक अॅपसह 22 बेकायदेशीर बेटिंग अॅप्स आणि वेबसाइट्सच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हे सगळे अॅप्लिकेशन्स बंद करण्यात आले आहेत.  बेकायदेशीर बेटिंग अॅप सिंडिकेटविरोधात ईडीने केलेल्या तपासानंतर आणि छत्तीसगडमधील महादेव बुकवर टाकलेल्या छाप्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अॅपचे बेकायदेशीर कामकाजही उघड करण्यात आले आहे.
छत्तीसगड पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेले आरोपी भीमसिंह यादव आणि असीम दास यांना ताब्यात घेण्यात आले. मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम 19 अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे.
Centre issues blocking orders against 22 'illegal' betting apps, including Mahadev Book app
— ANI Digital (@ani_digital) November 5, 2023
छत्तीसगड सरकारने कारवाई का केली नाही, केंद्र सरकारचा सवाल
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता, आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणाले, "छत्तीसगड सरकारला आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत वेबसाइट, अॅप बंद करण्याची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार होता. पण त्यांनी तसे केले नाही आणि कोणतीही विनंती केली नाही. सरकार गेल्या दीड वर्षांपासून याची चौकशी करत आहे. खरं तर, ईडीकडून आलेली ही पहिली आणि एकमेव कारवाई करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आलीये. पण छत्तीसगढ सरकारला करावाई करण्यापासून कोणीही थांबवले नव्हते.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची चौकशी सुरु
दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणा छत्तीगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याविरोधात महादेव बेटिंग अॅप प्रकरणी चौकशी करत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या अॅपचे प्रमोशन करणाऱ्यांना 508 कोटी रुपये दिल्याचा दावा ईडीकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान राज्यातील सुरक्षा सांभाळणाऱ्या केंद्रीय सुरक्षा एजन्सी सीआरपीएफवरही प्रश्न उपस्थित केले होते.
छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच सध्या छत्तीगडमध्ये सुरु असलेल्या या कारवायांचा परिणाम निवडणुकांवर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महादेव बेटींग अॅप प्रकरणात अनेक कलाकारांची नावे देखील नावं पुढे आली होती. त्यातच आता मुख्यमंत्र्यांची देखील चौकशी सुरु असल्यामुळे केंद्र सरकारकडून ही मोठी कारवाई करण्यात आलीये.
हेही वाचा :
<a href="https://ift.tt/2ovljN3 App : सट्टेबाजी हा काँग्रेसच्या बघेल सरकारचा साईड बिझनेस, छत्तीसगड प्रकरणावरून भाजपचे थेट हल्ला
from 2047 पर्यंत भारत होणार विकसित देश, तर 2030 पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था  https://ift.tt/WYHhdO1
https://ift.tt/U5Oqk7g
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.