Type Here to Get Search Results !
Jagdeep Dhankhar : महात्मा गांधी हे महापुरूष, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगपुरूष; भारताच्या उपराष्ट्रपतींचे वक्तव्य
नवी दिल्ली: महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे महापुरूष होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे युगपुरूष आहेत असं वक्तव्य देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनखड (<a href="https://ift.tt/2ifMnHE Dhankhar) यांनी केलं आहे. जैन विचारवंत आणि तत्त्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. उपराष्ट्रपतींच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांकडून चांगलीच टीका केली जात आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी महात्मा गांधी यांचे गेल्या शतकातील महान व्यक्ती असे वर्णन केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या शतकातील युगपुरुष असे संबोधले. ते म्हणाले की, महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला ज्या मार्गावर जायचे होते त्या मार्गावर नेले. महात्मा गांधी हे गेल्या शतकातील महान पुरुष होते. नरेंद्र मोदी हे या शतकातील विद्वान पुरुष आहेत.
काय म्हणाले जगदीप धनखड?
उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी या दोन महान व्यक्तींमध्ये एक गोष्ट समान आहे. त्यांनी श्रीमद् राजचंद्रजींना प्रतिबिंबित केले आहे. या देशाच्या विकासाला विरोध करणाऱ्या शक्ती आणि या देशाचा उदय पचवू न शकणाऱ्या शक्ती एकत्र येत आहेत. जेव्हा जेव्हा देशात काही चांगले घडते तेव्हा हे लोक टीका करायला लागतात,''
जे देश तुम्ही आजूबाजूला पाहता, त्यांचा इतिहास 300 किंवा 500 किंवा 700 वर्षांचा आहे, तर आपला इतिहास 5,000 वर्षांचा आहे असं उपराष्ट्रपती जयदीप धनखड म्हणाले.
विरोधकांनी निशाणा साधला
दरम्यान, बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांनी सोशल मीडियावर उपराष्ट्रपती धनखड यांनी मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले. गैरवर्तनाचे स्वातंत्र्य देऊन कोणते नवीन युग सुरू झाले? असा सवाल त्यांनी विचारला.
जैन विचारवंत आणि तत्त्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्याबद्दल
श्रीमद राजचंद्रजी यांचा जन्म गुजरातमध्ये 1867 मध्ये झाला होता आणि मृत्यू 1901 मध्ये झाला होता. ते जैन धर्मावरील शिकवणी आणि महात्मा गांधींच्या आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी ओळखले जातात. श्रीमद राजचंद्रजी आणि महात्मा गांधी यांची पहिली भेट 1891 मध्ये मुंबईत झाली, जेव्हा महात्मा गांधी हे तरुण बॅरिस्टर म्हणून इंग्लंडहून परतले होते.
ही बातमी वाचा:
<a href="https://ift.tt/SYdk25U Reservation History : भाजपच्या कमंडलला व्हीपी सिंहांचे 'मंडल'ने उत्तर, पवारांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जीआर काढला; असा झाला OBC आरक्षणाचा जन्म
from Uttar Kashi : उत्तर काशीत 16 दिवसांपासून बोगद्यातील कामगारांच्या सुटकेचे प्रयत्न https://ift.tt/bGmu5c3
https://ift.tt/aj56Urb
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.