उडुपी (कर्नाटक) : कर्नाटकातील (Karnataka) उडुपी शहरात भर दिवाळीत एका 12 वर्षांच्या मुलासह चार जणांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यामागच्या कारणाचा तपास सुरू असून, संशयित अद्याप फरार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या हत्येने उडुपी येथील रहिवाशांना धक्का बसला आहे.

उडुपीतील तृप्ती नगरजवळील एका घरात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 वर्षांचा मुलगा आवाज ऐकून खोलीत शिरला होता आणि कोणताही पुरावा राहू नये म्हणून हल्लेखोरांनी त्यालाही ठार मारले.

शेजारच्या एका मुलीने पोलिसांना सांगितले की, गोंधळ पाहून ती बाहेर आली होती, पण संशयितांनी तिला सुद्धा धमकावले. 46 वर्षीय हसीना आणि तिचा 23 वर्षीय मुलगा अफगानी या मृतदेहांची ओळख पटली आहे. त्यात 21 वर्षांची आयनाज आणि 12 वर्षांचा मुलगा होता.

चाकूने जखमी झालेल्या हसीनाच्या सासूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उडुपीचे पोलीस अधीक्षक अरुण कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, "चार जणांची हत्या करण्यात आली आहे आणि एक जखमी आहे. हसीना आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. सासूला गंभीर दुखापत झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, आम्ही घटनास्थळी भेट दिली आहे. आम्ही तपास करू आणि लवकरच दोषीला पकडण्यासाठी प्रयत्न करू.

इतर महत्वाच्या बातम्या

चेन्नईतील मयलापोर साईबाबा मंदिराच्या कळसाला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

from India-Bangladesh : त्रिपुरा पोलिसांना मोठं यश, 14 बांग्लादेशींना केली अटक; पोलीस आणि एनआयएची संयुक्त कारवाई https://ift.tt/ZSfWR9a
https://ift.tt/xED8wCp
Crime : भर दिवाळीत 12 वर्षाच्या शाळकरी मुलगा आईसह एकाच कुटुंबातील चौघांची हत्या; संशयित फरार
November 12, 2023
0
Tags