Success Story: सध्या शेती (Farmers) क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी प्रयोगशील शेती करतातयेत. तसेच अनेक शेतकरी पारंपारिक पिकांना बगल देत आधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत. अशाच एका 63 वर्षीय महिलेनं उत्तर प्रदेशमध्ये केशर शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय. या महिलेनं यूट्यूबच्या मदतीनं केशर शेती केली आहे. शुभा भटनागर असं या प्रयोगशील महिलेचं नाव आहे.

शुभा भटनागर यांनी मैनपुरीसारख्या शहरात साडेपाचशे चौरस फुटांच्या वातानुकूलित हॉलमध्ये माती आणि पाण्याशिवाय (एरोफोनिक तंत्र) केशराची लागवड केली आहे. त्यांच्या असणाऱ्या मेहनतीमुळं त्यांचा केशर लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. शुभा भटनागर सांगतात की मला काहीतरी वेगळं करायचं होतं. इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहून केशर लागवडीची कल्पना मनात आल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रामुख्यानं काश्मीरमध्ये (एरोफोनिक तंत्राचा वापर करून) केशरच्या शेतीची यशस्वीपणे लागवड केली जाते. मात्र, एका 63 वर्षीय महिलेनं उत्तर प्रदेशात केशर शेतीचा यशस्वी प्रयेग केला. सोशल मीडियावर काही माहिती गोळा केल्यानंतर या महिलेने केशर लागवडीत यश संपादन केले. त्यांच्या प्रयोगात त्यांच्या कुटुंबीयांचाही पूर्ण पाठिंबा होता. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाची जोरदार चर्चा होत आहे. डीएम मैनपुरी यांनी स्वतः जाऊन तो प्रयोग पाहिला. त्यांच्या यशस्वी प्रयोगाचे त्यांनी कौतुक केलं.

यूपीमध्ये केशराच्या लागवडीला सुरुवात

केशराची लागवड फक्त थंड भागातच शक्य आहे. हवामान अनुकूल नसले तरी केशराची लागवड फक्त काश्मीरमध्येच शक्य आहे. पण जेव्हा कोणी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं तर त्याला एक दिवस यश नक्कीच मिळतं. आता उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात केशरची यशस्वी लागवड केली जात आहे. केशर लागवडीचा हा यशस्वी पराक्रम 63 वर्षीय शुभा भटनागर यांनी केला आहे.

एरोफोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केशराची लागवड

प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शुभा भटनागर यांनी मैनपुरीसारख्या शहरात साडेपाचशे चौरस फुटांच्या वातानुकूलित हॉलमध्ये माती आणि पाण्याशिवाय (एरोफोनिक तंत्र) केशर लागवड सुरू केली. तिच्या मेहनतीने आणि समर्पणाने तिचा केशर लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला. शुभा भटनागर सांगतात की तिला काहीतरी वेगळं करायचं होतं. इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहून केशर लागवडीची कल्पना त्याच्या मनात आली. त्यासाठी त्यांनी काश्मीरमधील पंपोर येथून दोन हजार किलो केशर बियाणे खरेदी करुन ऑगस्ट महिन्यात केशर बियाणे लावले. एरोफोनिक तंत्राचा वापर करून पेरणी केली आणि आता केशराचे पीक नोव्हेंबर महिन्यात तयार झाले आहे.

केशरची निर्यात होणार नाही

शुभा भटनागर यांनी दिेलेल्या माहितीनुसार, केशर लागवडीसाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च येतो. त्या बाहेर केशर निर्यात करणार नाहीत, भारतातच केशर उत्पादनाचा मोठा तुटवडा आहे. ज्या तो तुटवडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. केशराच्या या यशस्वी लागवडीमुळे अनेक ग्रामीण महिलांना मदत होईल आणि रोजगारही मिळेल, असेही शुभा भटनागर यांनी सांगितलं. त्यांच्या यशात त्यांचा मुलगा अंकित भटनागर आणि सून मंजरी भटनागर यांचाही मोठा वाटा आहे. शुभा भटनागर यांचा केशर लागवडीचा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येत आहेत. मैनपुरीचे जिल्हा दंडाधिकारी अविनाश कृष्ण सिंह यांनी केशर लागवडीच्या यशस्वी प्रयोगाचे कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

from PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तेजस लढाऊ विमानातून उड्डाण https://ift.tt/Q842Rjh
https://ift.tt/82HDMES
63 वर्षी महिलेनं केला 'केशर लागवडीचा' यशस्वी प्रयोग; यूट्यूबच्या मदतीनं तंत्रज्ञानाचा वापर
November 25, 2023
0
Tags