Millionaires Left India: दरवर्षी लाखो लोक चांगल्या रोजगारासाठी परदेशात जातात. पण या सगळ्यातही असे शेकडो श्रीमंत लोक आहेत, जे दरवर्षी देश सोडून परदेशात स्थायिक होतात. बरं, श्रीमंत लोकांसाठी परदेशात जाऊन स्थायिक होणं ही काही नवीन गोष्ट नाही. या वर्षीही मोठ्या संख्येनं श्रीमंत भारतीय देश सोडून जाण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, यावर्षी चीनमधील (China) बहुतांश कोट्याधीश इतर देशांमध्ये जाऊन स्थायिक होणार आहेत. या यादीत भारत (India) दुसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत देशातील श्रीमंत देश का सोडत आहेत? हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे.

हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 नुसार, 2023 मध्ये 6500 हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स असलेल्या व्यक्ती म्हणजेच, HNI देश सोडू शकतात. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी असून गेल्यावर्षी तब्बल साडेसात हजार एचएनआयनं भारत सोडल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

2022 मध्ये 7500 भारतीयांनी देश सोडला

जगभरातील संपत्ती आणि गुंतवणुकीच्या स्थलांतरावर लक्ष ठेवणाऱ्या हेन्लेच्या अहवालात असं नमूद करण्यात आलं आहे की, आपला देश सोडून इतर देशांमध्ये जाऊन आपलं बस्तान बसवणाऱ्या लोकांची सर्वाधिक संख्या चीनमधील आहे, जिथून यावर्षी 13500 श्रीमंत लोक स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. तर गेल्या वर्षी 10 हजार 800 श्रीमंत लोक चीन सोडून इतर देशांमध्ये स्थायिक झाले आहेत.

या यादीत ब्रिटन तिसर्‍या स्थानावर आहे, जिथून यावर्षी 3200 लक्षाधीश देश सोडण्याची शक्यता आहे. तसेच, रशियामधील 3 हजार हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स व्यक्ती इतर देशांमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि ते या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.

जगभरातील श्रीमंतांच्या स्थलांतराचा ट्रेंड

तज्ज्ञांचे असं मत आहे की, लक्षाधीशांनी देश सोडणं ही फार चिंतेची बाब नाही. यामागचा युक्तिवाद असा आहे की, 2031 पर्यंत लक्षाधीशांची लोकसंख्या सुमारे 80 टक्क्यांनी वाढू शकते. या काळात भारत जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या वेल्थ मार्केटपैकी एक असेल. यासोबतच देशातील फायनांशिअल सर्विसेज, टेक्नॉलॉजी आणि फार्मा सेक्टरमधून सर्वात जास्त कोट्याधीश निघतील. अशा परिस्थितीत, भारताच्या दृष्टिकोनातून, 2022 मध्ये ही संख्या कमी होणं ही एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे.

श्रीमंत लोक आपला देश का सोडतात?

सर्वांच्याच मनात एक प्रश्न असतो की, श्रीमंत लोक घर का सोडतात? भारतात करसंबंधित नियमांमधील गुंतागुंतीमुळे दरवर्षी हजारो श्रीमंत लोक देश सोडून जातात. ऑस्ट्रेलिया, दुबई आणि सिंगापूर सारखी ठिकाणं जगभरातील श्रीमंतांद्वारे सर्वात जास्त पसंत केली जात आहेत कारण श्रीमंतांना अशा देशांमध्ये जाणं आवडतं जिथे कर संबंधित नियमांमध्ये लवचिकता असते.

या अहवालानुसार, गेल्या वर्षीपेक्षा अधिक श्रीमंत लोक यूके, रशिया, ब्राझील, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, जपान, व्हिएतनाम आणि नायजेरियामधून स्थलांतरित होतात. तसेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक परदेशी श्रीमंत ऑस्ट्रेलिया, यूएई, सिंगापूर, अमेरिका, स्वित्झर्लंड, कॅनडा, ग्रीस, फ्रान्स, पोर्तुगाल, न्यूझीलंड आणि इटलीमध्ये स्थायिक होऊ शकतात.

ऑस्ट्रेलिया सर्वांच्या आवडीचं ठिकाण

ऑस्ट्रेलिया हे लक्षाधीशांचं सर्वात आवडतं ठिकाण असल्याच्या अनेक खास गोष्टी आहेत. ऑस्ट्रेलियाचं हवामान, समुद्रकिनारे, सेफ्टी अँड सिक्युरिटी, उत्तम आरोग्य व्यवस्था, क्वॉलिटी ऑफ लाईफ, उत्तम शिक्षणाच्या संधी, सुलभ कर प्रणाली आणि चांगली अर्थव्यवस्था यामुळे बहुतेक श्रीमंत लोकांना ऑस्ट्रेलियात स्थायिक व्हायला आवडतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/vYoGmU9 In India: देशात 25 वर्षांखालील 42 टक्के तरुण बेरोजगार; अहवालातून भीषण वास्तव समोर

from india https://ift.tt/3qJoy9I
https://ift.tt/DjatpUJ
Millionaires Left India: यावर्षी 6500 श्रीमंत भारतीय सोडणार देश, चीनची अवस्था आणखीनच बिकट... 'या' देशाला सर्वाधिक पसंती
September 22, 2023
0
Tags