<p>भारत आणि कॅनडामध्ये प्रचंड तणाव वाढलाय. भारताविरोधात कट करणाऱ्या खलिस्तानवाद्यांना आश्रय देण्याची कॅनडाची जुनीच खोड आहे. आताही खलिस्तानवाद्यांच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडामध्ये वातावरण चांगलंच तापलंय. त्या पार्श्वभूमीवर महिन्द्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने मोठा निर्णय घेतलाय. कॅनडाच्या रेसन एरोस्पेस कंपनीतून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने भागीदारी मागे घेतलीय. आणि रेसन एरोस्पेस कंपनीशी संबंध तोडून टाकलेत. रेसन एरोस्पेस कंपनीत महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीची ११.१८ टक्के हिस्सेदारी होती, ती आता काढून घेण्यात आलीय. दरम्यान, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमावर नेहमीच भाष्य करणाऱ्या आनंद महिंद्रांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतंय.</p>
from india https://ift.tt/VOca0SQ
https://ift.tt/9KIohTt
Mahindra Canada : कॅनडाच्या रेसन एरोस्पेस कंपनीतून महिंद्रा कंपनीने भागीदारी घेतली मागे
September 21, 2023
0
Tags