India-Canada Relations: खलिस्तान समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कॅनडानं (Canada) मंगळवारी (19 सप्टेंबर) आपल्या नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये कॅनडानं आपल्या देशातील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये न जाण्यास सांगितलं आहे. कॅनडानं यामागे देशातील नागरिकांच्या सुरक्षेचं कारण दिलं आहे. अपडेटेड अॅडव्हायजरीमध्ये कॅनडानं म्हटलंय की, "जम्मू काश्मिरमध्ये जाऊ नका, कारण तिथे दहशतवाद, अतिरेकी, नागरी अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे."

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी खलिस्तानी समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटचा हात असल्याचं कॅनडाच्या संसदेला संबोधिक करताना म्हटलं होतं. तेव्हापासून संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. अशातच भारतानं कॅनडाच्या पंतप्रधानांचं वक्तव्य फेटाळून लावलं आहे. त्यावरुन कॅनडा आणि भारत यांच्यात मोठा वाद उफाळून आला आहे. कॅनडानं केवळ आरोपच केले नाहीत, तर भारतीय राजदूतांची देशातून हकालपट्टीही केली होती. अशातच आता कॅनडानं नवी अॅडव्हायजरी जारी करत वादात आणखी भर टाकली आहे.

"Avoid all travel to the Union Territory of Jammu and Kashmir due to the unpredictable security situation. There is a threat of terrorism, militancy, civil unrest and kidnapping. This advisory excludes travelling to or within the Union Territory of Ladakh," says Canada in its… pic.twitter.com/AxV7aZ18q3
— ANI (@ANI) September 19, 2023

कॅनडाच्या या चिथावणीखोर वक्तव्यानंतर भारतानंही पलटवार करत अत्यंत परखड शब्दांत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना खडे बोल सुनावले आहेत. कॅनडाकडून करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच, भारतानंही कॅनडाच्या एका वरिष्ठ राजदुताची हकालपट्टी केली आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो काय म्हणाले?

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, भारत सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. आम्ही चिथावणी देण्याचा किंवा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही फक्त वस्तुस्थिती मांडत आहोत." तसेच, पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही सर्व काही स्पष्ट करण्यासाठी आणि योग्य प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारसोबत काम करू इच्छितो." दरम्यान, कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर 18 जून रोजी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची गोळ्या झाडून हत्या केली होती. याच प्रकरणी कॅनडाकडून भारतावर गंभीर आरोप करण्यात आले असून भारतानं मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

हरदीप सिंह निज्जर आहेत तरी कोण?

हरदीप सिंह निज्जर बंदी घातलेल्या फुटीरतावादी गट शीख फॉर जस्टिस (SFJ) शी संबंधित होता. गुरुपतवंत सिंह पन्नू यांच्यानंतर ते या गटाचे दुसरा नेता होता. यावर्षी 18 जून रोजी ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वाराबाहेर निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. निज्जर हा जालंधरच्या भारसिंह पुरा गावचा रहिवाशी होता. 1996 मध्ये ते कॅनडाला गेले, त्यानंतर त्यांनी कॅनडामध्ये प्लंबर म्हणून काम सुरू केलं. मात्र कालांतरानं तो खलिस्तानी कारवायांमध्ये सामील झाला.

निज्जरला कालांतरानं कॅनडाचं नागरिकत्व मिळालं. त्यामुळेच त्यांच्या हत्येनंतर कॅनडातील काही शीख फुटीरतावादी संघटनांनी या हत्येचा तपास करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली. कॅनडाच्या पंतप्रधानांनी निज्जरच्या हत्येबाबत संसदेत माहिती दिली. ते म्हणाले की, कॅनडाच्या नागरिकांची त्याच्या भूमीवर हत्या करणं हे सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांत कॅनडा हे खलिस्तानी कारवायांचं केंद्र बनलं आहे. अनेक खलिस्तानी दहशतवादी येथे लपले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/b3LOShd Singh Nijjar: कॅनडाच्या वक्तव्यावर भारत संतप्त, कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी, 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश

from india https://ift.tt/kCYegID
https://ift.tt/Mm7VsYd
India-Canada Relations: "जम्मू-काश्मीरला जाऊ नका, तिथे..."; भारतासोबतच्या वादविवादात कॅनडाकडून नागरिकांसाठी नवी अॅडव्हायजरी जारी
September 19, 2023
0
Tags