Type Here to Get Search Results !

Online Passport : या सोप्या स्टेप्स वापरून घरबसल्या काढा ऑनलाईन पासपोर्ट, जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे

मुंबई: अनेकांना परदेशात जायचं असतं, मग ते फिरायला असो वा आणखी कोणत्याही कारणासाठी. पण परदेशात जाण्यासाठी जो पासपोर्ट लागतो तो कसा काढायचा याची माहिती नसते. तसेच त्यासाठी काय काय प्रक्रिया असते, काय कागदपत्रं लागतात याचीही माहिती नसते. अशा वेळी मग एजंट लोकांचे फावते आणि सहजसाध्य उपलब्ध होणारे पासपोर्ट काढण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सोप्या शब्दात पासपोर्ट कसा काढायचा याची माहिती देणार आहोत.

ऑनलाईन पासपोर्ट काढण्यासाठी सर्वप्रथम पासपोर्ट सेवा (<a href="https://ift.tt/0VkrGJY Seva) या परराष्ट्र खात्याच्या वेबसाईटला भेट द्या. या ठिकाणी न्यू यूजर रजिस्ट्रेशन (New User Registration) वर क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक असलेली माहिती भरा. माहिती भरण्याची ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. माहिती भरल्यानंतर रजिस्ट्रर या बटनावर क्लिक करा.

पासपोर्टसाठी रजिस्ट्रेशन केल्यानतर तुम्हाला एक लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळेल. तो टाकून न्यू पासपोर्ट अॅप्लिकेशन या बटनावर क्लिक करा. त्यानंतर त्यामध्ये तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि पत्ता तसेच इतर आवश्यक ती माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राला किंवा पासपोर्ट कार्यालयाच्या भेटीसाठी अपॉईंटमेंट घ्या. ही अपॉईंटमेंट तारीख आणि वेळ निवडून ऑनलाईन पद्धतीने घेता येईल. त्यानंतर तुम्हाला पासपोर्टसाठी त्या ठिकाणी देण्यात आलेली फी भरावी लागेल. ही फी नेटबँकिंग किंवा यूपीआयच्या माध्यमातून भरता येईल.

ज्या दिवसाची वेळ मिळेल त्या दिवशी पासपोर्ट कार्यालयाला भेट द्या. पासपोर्ट कार्यालयात जाताना खालील मूळ कागदपत्रे घेऊन जाणं आवश्यक आहे.

Required Documents For Passport : पासपोर्ट अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

- ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड)
- पत्ता पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, किंवा लाईट बिल)
- जन्मतारीख पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला)
- पासपोर्ट साईजचे दोन फोटो.

पासपोर्ट कार्यालयात कागदपत्रं दाखवल्यानतंर तुमच्या पासपोर्टची पुढील प्रक्रिया केली जाते. त्यासाठी पोलिस व्हेरिफिकेशनही केलं जातं. तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर दिला जातो. त्याच्या माध्यमातून तुम्ही ही प्रक्रिया ट्रॅक करू शकता.

अशा पद्धतीने कोणत्याही एजंटच्या मदतीविना ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सहजपणे पासपोर्ट काढू शकता.

ही बातमी वाचा:

<a href="https://ift.tt/oTBzRF5 Passport : भारतीय पासपोर्ट चार रंगात... प्रत्येक रंगाच्या पासपोर्ट धारकांना मिळते विशेष सुविधा

from india https://ift.tt/vi4EsHu
https://ift.tt/rTa20qm

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.