Type Here to Get Search Results !

11th July Headline : कगरसच दललत बठक कलम 370 वर सरवचच नययलयमधय सनवण आज दवसभरत

11th July Headline : राज्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते दिल्लीत बैठकीसाठी हजर राहणार आहेत. तर उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाच्या सुनावण्या होणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे त्यांच्या कर्जत जामखेडच्या मतदारसंघाला भेट देणार आहेत. केंद्रीय अर्थमंंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 50 वी बैठक पार पडणार आहे.

राज्यातले काँग्रेसचे नेते दिल्लीत

काँग्रेस मुख्यालयात अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बैठक राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील संघटन बदल, भविष्यातल्या निवडणुकांबद्दल रणनीती आणि ताज्या परिस्थितीवर चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे. तर या बैठकीसाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, अमित देशमुख, सुनील केदार, सतेज पाटील, भाई जगताप, वर्षा गायकवाड, नसीम खान यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

रोहित पवार त्यांच्या कर्जत मतदारसंघात

पक्षात फूट पडल्यानंतर आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच त्यांच्या कर्जत - जामखेडच्या मतदारसंघात असणार आहेत.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणावर सुनावणी

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे.    सप्टेंबर 2022 पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना कोर्टात स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे या सुनावणीमध्ये यावरील स्थगिती उठणार की कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई उच्च न्यायमधील महत्त्वपूर्ण सुनावण्या पार पडणार

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय आणि प्रविण राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करावा या मागणीसाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल परब यांची हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा अनिल परब यांनी दावा केला आहे.या प्रकरणी उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे.

हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. बदलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांना दिलेला अंतरिम दिलासा कायम राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसच यामध्ये ईडी काय भूमिका घेणार हे देखील पाहणं गरजेचं आहे.

सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाच्या सुनावण्या होणार

कलम 370 प्रकरणात सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

अडाणी यांच्या हिंडनबर्गप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. तर यावर  सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे.

प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी.

मणिपूर हिंसाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायलयामध्ये सुनावणी.

जीएसटी परिषदेची 50 वी बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 50 वी बैठक पार पडणार आहे.

from india https://ift.tt/arcFowX
https://ift.tt/cdjFGIZ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.