Type Here to Get Search Results !
Monsoon Update : हमचल परदशत ढगफट उततरखडमधय भसखलन; मबईसह दललत ठकठकण सचल पण परवतय भगत अलरट जर
<a href="https://ift.tt/46qwjox Weather Update : देशात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. डोंगराळ भागात लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) काही ठिकाणी भूस्खलनाच्या (Landslide) घटना समोर आल्या आहेत. तर हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) शिमल्यात (Shimala) ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसानंतर मुंबई(Mumbai), दिल्ली (Delhi) सारख्या मोठ्या शहरांमध्येही पाणी साचलं आहे.
अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस
सलग दोन दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांत देशातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे देशात काही ठिकाणी ढगफुटी, भूस्खलन झालंय तर काही ठिकाणी पाणी साचलं आहे. पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु असून या भागात हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कुठे ढगफुटी, तर कुठे भूस्खलन
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे लोकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये ढगफुटी झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. हिमालचमधील सोलन आमि हमीरपूरमध्ये रविवारी ढगफुटी झाल्यामे पूरसृश्य परिस्थिती निर्माण झाली. शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये जोरदाप पावसामुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाण भूस्खलन झालं आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोनप्रयाग येथे केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.
उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पाऊस
हरिद्वारमध्येही सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत आहे. कोणतीही जीवितहानी समोर आलेली नाही. शहरातील अनेक भागांतून पाणी तुंबण्याची समस्या समोर आली आहे. काही लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. प्रशासनाकडून ठिकठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. उत्तराखंडच्या डेहराडून आणि ऋषिकेशमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे.
हिमाचल प्रदेशात ढगफुटी
from india https://ift.tt/azuhH3q
https://ift.tt/WKaLbtu
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.