Type Here to Get Search Results !
Go First Flights Cancelled: गो फर्स्टच्या प्रवाशांनी लक्ष द्या! आता 'या' तारखेपर्यंतची सर्व उड्डाणं रद्द
Go First Flights Cancelled: देशात स्वस्त विमानसेवा पुरवणाऱ्या <a href="https://ift.tt/IkDmjRX एअरलाइन्सनं स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केल्यानं भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये 3 मे रोजी स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज केल्यानंतर कंपनीनं आपली सर्व उड्डाणं रद्द केली होती. आता या विमान कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. अडचणीत असलेल्या GoFirst नं 7 जून 2023 पर्यंत सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. यापूर्वी कंपनीनं 4 जूनपर्यंत उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, आता कंपनीनं तारीख आणखी पुढे ढकलत उड्डाणं 7 जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
गो फर्स्टची ट्वीट करून माहिती
गो फर्स्टनं शुक्रवारी आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देताना खंत व्यक्त केली आहे. कंपनीनं सांगितलं की, ऑपरेशनल कारणांमुळे कंपनीनं आपली उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. यासोबतच रिफंडची माहिती देताना कंपनीनं सांगितलं की, एअरलाइन्स लवकरच सर्व प्रवाशांना त्यांचे पैसे रिफंड करणार आहे. यासोबतच कंपनीनं असंही म्हटलं आहे की, लवकरच आपल्या फ्लाइट्स बुक करण्याची प्रक्रियाही कंपनी सुरू करणार आहे.
— GO FIRST (@GoFirstairways) June 2, 2023
डीजीसीएसमोर सहा महिन्यांचा आराखडा
फायनान्शियल एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, GoFirst नं 2 जून रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडे 6 महिन्यांचा रिवायवल प्लान सादर केला आहे. इंटरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल (IRP) नं ही योजना DGCA ला सादर केली आहे. अहवालानुसार, एअरलाइन लवकरच 26 विमानांसह आपलं ऑपरेशन सुरू करण्याचा विचार करत आहे.
GoFirst चे आर्थिक संकट कसं सुरू झालं?
देशात स्वस्त विमानसेवा पुरवण्यासाठी GoFirst कंपनी ओळखली जाते. गो फर्स्ट एअरनं देशात स्वस्त हवाई सेवा सुरू ठेवली आहे. कंपनीनं स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी NCLT कडे 3 मे रोजी अर्ज केला होता. यासोबतच विमान कंपन्यांनी प्रॅट अँड व्हिटनी या अमेरिकन कंपनीवर आरोप केला होता की, विमानाच्या खराब इंजिनमुळे विमान कंपन्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना प्रॅट अँड व्हिटनी यांनी GoFirst चे सर्व आरोप निराधार असल्याचं सांगून गोफर्स्टला कर्ज न फेडण्याचा जुना इतिहास असल्याचं सांगितलं होतं. डीजीसीए आणि एनसीएलटी गो फर्स्टचं ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत.
from india https://ift.tt/Bf8LsNO
https://ift.tt/nkPVhDL
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.