Type Here to Get Search Results !

Cyclone Biparjoy : बपरजय चकरवदळमळ गजरतमधय 22 जण जखम तर 23 जनवरच मतय 940 गवतल वजपरवठ खडत

Cyclone Biparjoy : बिपरजॉय (Cyclone Biparjoy) चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टी भागात धडकलंय. लॅंडफॉलची प्रक्रिया पूर्ण झाली असून, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ताशी तब्बल 145 किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आहे. या चक्रीवादळामुळं चक्रीवादळामुळे 22 लोक जखमी झाले आहेत तर 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 524 झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे 940 गावातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

बिपरजॉय चक्रीवादळामुळं कच्छ आणि सौराष्ट्र भागात वाऱ्याचा वेग ताशी 115 ते 125 किलोमीटर आहे. जखौ बंदरापासून हे चक्रीवादळ केवळ 10 किलोमीटर दूर आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे वादळ उद्या (17 जून) दक्षिण राजस्थानमध्ये पोहोचेल. त्यामुळं तिथे हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सखल भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पुराची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गुजरातमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असून, त्यात कच्छ, पाटण, बनासकांठा येथे अधिक पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.

चक्रीवादळामुळे गुजरामध्ये मोठं नुकसान झालं आहे. आत्तापर्यंत 22 लोक जखमी झाले आहेत तर 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 524 झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे 940 गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, आत्तापर्यंत 74 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. नुकसान झालेल्या भागात NDRF चं मदतकार्य सुरु आहे.

केंद्र आणि राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून

गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर गुरुवारी संध्याकाळी धडकलं. त्यानंतर गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा (heavy rainfall and strong winds) सुरू झाला. त्यामुळे किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाऱ्याचा वेगही 125 ते 145 किमी इतका आहे. त्यामुळे अनेक झाडे कोसळली आहेत. दरम्यान, राज्य सरकार आणि केंद्र सरकार सतत या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. खबरदारी म्हणून किनारी भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/UEiSY9x Biparjoy: बिपरजॉय गुजरातला धडकलं... लँडफॉलनंतर द्वारका आणि कच्छमध्ये विध्वंस सुरू, 240 गावांतील वीज पुरवठा खंडीत

from india https://ift.tt/rm2FQl8
https://ift.tt/witRXre

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.