<p>रक्ताचं पाणी करून कमावलेली पदके पैलवान गंगेत विसर्जित करणार, या बातमीने देशात खळबळ उडाली होती. आता काय होणार, याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला होता. पण शेतकरी नेते नरेश टिकैत यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आणि पैलवानांनी कटू निर्णय मागे घेतला. हरिद्वारच्या गंगा किनाऱ्यावर पदके विसर्जित करण्यासाठी गेलेले पैलवान परतले. पण त्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे. यातून एक बाब स्पष्ट झाली, सरकारला पैलवानांच्या आंदोलनाशी, त्यांच्या देशाला पदक मिळवून देणाऱ्या मेहनतीशी, आणि त्यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाशी काहीही देणंघेण नव्हतं. पदके विसर्जित करण्याच्या निर्णयाची दखल सरकारी पातळीवर साधी दखलही घेतली गेली नाही.. काही दिवसांपासून महिला-पुरुष पैलवानांचं जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप असून त्यांना अटक करण्याची मागणी ते करत आहेत. २८ मे रोजी तर दिल्ली पोलिसांनी आंदोलक पैलवानांची धरपकड केली होती, त्यांना फरपटत नेलं होतं. त्यानंतर त्यांनी पदके गंगेत विसर्जित करण्याती घोषणा केली हो</p>
from india https://ift.tt/s90wGPj
https://ift.tt/Jn5ca8T
Naresh Tikait to Wrestlers : पदके विसर्नजित नरेश टिकैत यांच्या मध्यस्थीनंतर पैलवानांनाचा निर्णय मागे
May 30, 2023
0