Type Here to Get Search Results !

Lok Sabha Election: आज निवडणुका झाल्या तर कोण होणार पंतप्रधान अन् कोणाचं सरकार? मोदी, राहुल गांधींबाबत सर्वेक्षणात खुलासा

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election) आता जवळपास एक वर्ष उरलं आहे. अशा परिस्थितीत सत्तेला 9 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासोबतच भाजपनं (BJP) पुढील निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, लोकनिती-सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) नं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) लोकप्रियतेबाबत NDTV साठी एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर 10 ते 19 मे दरम्यान 19 राज्यांमध्ये करण्यात आलं. कर्नाटकात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी पीएम मोदींच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम झालेला नाही, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. पंतप्रधान मोदींची (PM Modi) लोकप्रियता कायम आहे.

पंतप्रधान मोदींना जनतेची पहिली पसंती

या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला होता की, आज निवडणुका झाल्या तर देशाचा पंतप्रधान कोण होणार? सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 43 टक्के लोकांनी सांगितलं की, जर आज निवडणुका झाल्या तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी त्यांची पहिली पसंती असतील. पीएम मोदींनंतर लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आपली पसंती असल्याचं सांगितलं. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 27 टक्के लोकांनी त्यांना राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहायचं असल्याचं सांगितलं.

नितीश कुमार, ममता बॅनर्जी सर्वेक्षणात कोणत्या क्रमांकावर?

सर्वेक्षणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 4-4 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर अखिलेश यादव (3 टक्के), नितीश कुमार (1 टक्का) आणि 18 टक्के लोकांनी इतरांची नावं घेतली आहेत. 2019 आणि 2023 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे आकडे पंतप्रधान मोदींच्या (44 ते 43 टक्के) लोकप्रियेत काहीशी घट दाखवत आहेत.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे 43 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए (नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स) सलग तिसऱ्यांदा विजयी झाली पाहिजे, तर 38 लोक या मताच्या विरोधात आहेत. आज निवडणुका झाल्या तर ते भाजपला मतदान करतील, असं सुमारे 40 टक्के लोकांचं म्हणणं आहे. तसेच, 28 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, ते भाजपला मतदान करतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/E6NpGXv C Voter Survey:  दोन हजारांच्या नोटा आणि आगामी निवडणुकांचा संबंध? लोकांना काय वाटतं? सर्वेक्षणातून समोर आली मोठी बाब

<a href="https://ift.tt/mtkhrRO Sabha Election : 2024 मध्ये काँग्रेस भाजपला धक्का देणार, सी व्होटरच्या सर्वेक्षणातून आकडेवारी समोर

from india https://ift.tt/qk4xVzN
https://ift.tt/BctvqSi

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.