Type Here to Get Search Results !

21th May In History: राजीव गांधी यांची तामिळनाडूमध्ये हत्या, दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांचे निधन, आज दिवसभरात

21th May In History : भारताच्या राजकीय इतिहासातील आजचा काळा दिवस आहे. आजच्याच दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. श्रीलंकेतील दहशतवादी संघटना एलटीटीईने त्यांच्यावर आत्मघातकी बॉंब हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. इतिहासात आजच्या दिवसातील इतर महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया,

1928  : मराठी लेखक, समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांची जयंती

मराठी लेखक, समीक्षक ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी यांचा जन्म 21 मे 1928 रोजी झाला. ते मराठी भाषेतील लेखक, समीक्षक होते. मौज, साधना मासिकांतून यांचे बरेच नाट्यविषयक लिखाण प्रसिद्ध झाले आहे. मराठी व इंग्रजी भाषेतून कलासमीक्षेच्या क्षेत्रात त्यांनी पन्नासहून अधिक वर्षे कामगिरी केली.  कला व नाट्य क्षेत्रातील आस्वादपर समीक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. इंग्रजीमध्ये एमए पूर्ण केल्यानंतर 1951 मध्ये ज्ञानेश्वर नाडकर्णी लंडनच्या भारतीय दूतावासात रुजू झाले. दोन वर्षांतच ते भारतात परतले आणि मुंबईतील महाविद्यालयांमध्ये 1956 पर्यंत त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. त्यानंतरची चार वर्षे त्यांनी जाहिरातींचे कॉपीरायटिंग केले. प्रामुख्याने त्यांनी शिल्पी अॅडवरटायजिंगसाठी कॉपीरायटर म्हणून काम केले. याच काळात त्यांनी फ्री प्रेस जर्नलसाठी सहसंपादक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. 1959 ते 1961 या कालावधीत त्यांनी फ्री प्रेससाठी काम पाहिले तर 1961 ते 68 या काळात त्यांनी फायनान्शिअल एक्स्प्रेससाठी काम पाहिले.

1931 : कवी, लेखक, व्यंगचित्रकार शरद जोशी यांचा जन्मदिन

कवी, लेखक, व्यंगचित्रकार शरद जोशी यांचा जन्म 21 मे 1931 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात झाला. ज्या काळात देशात जातीयवाद शिगेला पोहोचला होता, त्या काळात त्यांनी दुसऱ्या धर्माच्या स्त्रीशी लग्न करून आपली धर्मनिरपेक्षता, मुक्त विचार आणि निर्भयपणा दाखवला.  शरद जोशी यांनी आपल्या व्यंगचित्रातून सामाजिक आणि राजकीय वातावरणावर खोलवर घाव घातला आहे. अनेक चित्रपट आणि टेलिफिल्म्ससाठी त्यांनी संवाद लिहिले.

1971 : प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माता व पटकथा लेखक आदित्य चोप्रा यांचा जन्मदिन

आदित्य चोप्रा यांचा जन्म 21 मे 71 साली झाला. ते चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक आहेत. सध्या ते यश राज फिल्म्स या मनोरंजन कंपनीचे चेअरमन आहेत. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मोहब्बतें व रब ने बना दी जोडी हे त्यांने आजवर दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. याबरोबर बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांचे ते निर्माता आहेत. त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.

1471 : प्रसिद्ध जर्मन चित्रकार अल्ब्रेक्ट ड्यूरर यांचा जन्मदिन.

1916 :  प्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार व लेखक हॅरोल्ड रॉबिन्स यांचा जन्मदिन.

1922 : प्रसिद्ध अमेरिकन आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कोर्टाचे न्यायाधीश जेम्स लोपेझ वॉटसन यांचा जन्मदिन.

1991 : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या.

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi)यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमध्ये हत्या करण्यात आली. श्रीलंकेतील एलटीटीई या दहशतवादी संघटनेने त्यांची हत्या केली. राजीव गांधी 1944 मध्ये जन्म झाला. राजीव गांधीचे सुरुवातीचे शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. 1961 ला पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. 1981 मध्ये त्यांनी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी लोकदलचे उमेदवार शरद यादव यांचा 2 लाख मताधिक्याने पराभव केला. 31 ऑक्टोंबर 1984 रोजी इंदिराजींची हत्या झाली. त्यावेळी राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पंतप्रधानपदी निवड होताच राजीव गांधींनी लोकसभा बरखास्त करत निवडणुका घेतल्या. मोठ्या बहुमताने काँग्रेस निवडून आली. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदा झाला. त्यांनी रशिया सोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन यांसोबतही चांगले संबंध बनवण्याचे प्रयत्न केले.  21 मे 1991 रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारभेदराम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली.

1979 : जानकीदेवी बजाज यांचे निधन

ब्रिटीश कालीन भारतातील स्वातंत्र्य कार्यकर्त्या आणि अवज्ञा आंदोलनाच्या सदस्या जानकी देवी यांचा जन्म 7 जानेवारी 1893 रोजी मध्य प्रदेशातील जाओरा येथील अग्रवाल कुटुंबात झाला. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांचा विवाह बारा वर्षाच्या जमनालाल बजाज यांच्यासोबत झाला. त्यांच्या लग्नाच्या वेळी बजाज कुटुंब अत्यंत मध्यमवर्गीय व्यापारी लोकांपैकी एक होते. काही वर्षांमध्ये, जमनालालने एक मोठे व्यावसायिक साम्राज्य निर्माण केले आणि ते भारतातील सुरुवातीच्या उद्योगपतींपैकी एक होते.

2005 :  भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांचे निधन

सुबोध मुखर्जी हे फिल्म निर्माता शशिधर मुखर्जी यांचे भाऊ व प्रसिद्ध अभिनेता जॉय मुखर्जी यांचे काका होत. चित्रपट व्यवसायात अमाप प्रसिद्धी मिळविलेल्या सुबोध मुखर्जी यांना मात्र वकील होण्याची महत्वाकांक्षा बाळगली होती. त्यांना वकील बनावयाचे होते. त्यादृष्टीने त्यांचे एल.एल.बी. चे शिक्षण चालू होते. पण शेवटच्या वर्षाला असताना भारतात स्वातंत्र्य चळवळीला जोर चढला आणि देशप्रेमामुळे सुबोधबाबूंनी चळवळीत उडी घेऊन तुरुंगवास पत्करला.

1942 मध्ये ते तीन महीने जेलमध्ये राहिले होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले व तुरुंगातून सुटून आल्यावर त्यांना शिक्षणात रस वाटेना. आता काय करावे हा प्रश्न भेडसावत असतानाच त्यांचे बंधू शशिधर मुखर्जी यांनी ‘फिल्मीस्तान’ ची स्थापना केली. त्यांच्याच आग्रहावरून सुबोध मुखर्जी यांनी फिल्मी दुनियेत आपले नशीब अजमावून पाहण्याचे ठरविले व ते मुंबई येऊन आपले बंधू शशिधर यांच्या बरोबर फिल्मिस्तान स्टुडियो मध्ये काम करू लागले. त्यानंतर ते भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक झाले

1993 : ब्रिटीश सैन्य दलातील हवाई अधिकारी मेजर जनरल जॉन डटन जॉनी फ्रॉस्ट यांचे निधन.

1973  : महाराष्ट्रीयन मराठी मुद्रण व प्रकाशन शेत्रातील व्यावसायिक बाळकृष्ण ढवळे यांचे निधन.

महत्वाच्या घडामोडी

1881 : अमेरिकेतील टेनिस खेळासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय नियामक संस्था (युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशन) ची स्थापना करण्यात आली.

1818 : युरोपीय देशांतील गृहयुद्ध संपल्यानंतर क्लारा बार्टन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. मध्ये अमेरिकन रेड क्रॉसची स्थापना केली.

1904 : फुटबॉल खेळाची सर्वोच्च संस्था आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची (फिफा) स्थापना पॅरिस या देशात करण्यात आली.

1970 : अमेरिकेने आण्विक शास्त्राची चाचणी केली

1994 :  अभिनेत्री सुश्मिता सेनला 43 वा विश्वसुंदरी किताब मिळाला.

from india https://ift.tt/3qfPdav
https://ift.tt/BIt7EPx

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.