Kedarnath Dham:  भारतात 12 ज्योर्तिलिंगांना विशेष महत्त्व आहे. चारधाम (chardham) यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. केदारनाथ (kedarnath) हे चारधाम यात्रेतील एक धाम असून 12 ज्योर्तिलिंगापैकी खूप महत्त्वाचे मानले जाते. केदारनाथ मंदिरातील कवाडं सहा महिन्याच्या शीतकालीन कालावधीनंतर सोमवारी पहाटे 6.20 वाजता उघडली. या क्षणाचं औचित्य साधत मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिराला सजावट करण्यासाठी तब्बल 20 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला आहे.

संपूर्ण जगात 11 वं ज्योतिर्लिंग म्हणून ख्याती असणाऱ्या भगवान केदारनाथांच्या मंदिराची कवाडं मंगळवारी सकाळी परंपरागत पूजा- अर्चा पार पडण्यानंतर खोलण्यात आली. यावेळी आठ हजार भाविक उपस्थित होते. उत्तराखंडची चारधाम यात्रा शनिवारी 22 एप्रिलपासून सुरू झाली आहे.. 22 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचा दरवाजा उघडला आहे तर 27 एप्रिलला बद्रिनाथ धामचा दरवाजा उघडणार आहे. खरंतर केदारनाथ मंदिर 22 एप्रिल म्हणजेच अक्षय्य तृतीयेलाच खुलं होणार होतं. मात्र प्रचंड बर्फवृष्टी आणि पावसामुळे 25 एप्रिल ही तारीख ठरवण्यात आली.

#WATCH उत्तराखंड: केदारनाथ धाम के कपाट खुल गए हैं। मंदिर को 20 क्विंटल फूलों से सजाया गया है। pic.twitter.com/4Z5lE4MPbJ
— ANI_HindiNews (@AHindinews) April 25, 2023

दुसरीकडे, हवामान खात्याने 29 एप्रिलपर्यंत बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे, राज्य सरकारने रविवारी केदारनाथसाठी भाविकांची नोंदणी 30 तारखेपर्यंत थांबवली. ऋषिकेश, गौरीकुंड, गुप्तकाशी आणि सोनप्रयागसह अनेक ठिकाणी यात्रेकरूंना सध्या तिथेच थांबण्यास सांगितले जात आहे.

बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय म्हणाले की, प्रचंड थंडी असूनही मंदिराचे दरवाजे उघडताना हजारो भाविक केदारनाथ धाममध्ये पोहोचले आहेत. केदारनाथ धाममध्ये अधूनमधून होणारी बर्फवृष्टी आणि पाऊस पाहता त्यांनी भाविकांना यात्रा सुरू करण्यापूर्वी राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि प्रतिकूल हवामान लक्षात घेता केदारनाथ धाममध्ये निवासाची व्यवस्था अगोदरच करावी.

#WATCH उत्तराखंड: केदारनाथ धाम के कपाट श्रद्धालुओं के लिए खुल गए हैं। कपाट खुलने के बाद ढोल बजाकर जश्न मनाया गया। pic.twitter.com/FktfaHSSx6
— ANI_HindiNews (@AHindinews) April 25, 2023

केदारनाथाचे दरवाजे सहा महिन्यांनंतर उघडणार असल्याने भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी येथे पहायला मिळतेय. भक्तीभावाने देशभरातून लोकं केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी येतात. दरवाजे उघडण्याचा सोहळा पाहण्यासाठी येथे भक्तगण मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पण खराब वातावरणामुळे भक्तांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे भक्तांनी सांभाळून राहण्याचे तसेच काळजी घेण्याचे आवाहन येथील प्रशासनाने केले आहे.

from india https://ift.tt/PcIoEkz
https://ift.tt/Vs30GmZ
Kedarnath Video : बम भोले! उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची कवाडं उघडली, 20 क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट
April 24, 2023
0