Type Here to Get Search Results !

Parliament Budget Session : गेल्या 5 दिवसात केवळ 97 मिनिटे चाललं संसदेचं कामकाज, विरोधक-सत्ताधाऱ्यांचा गदारोळ; 35 विधेयके प्रलंबित

Parliament Budget Session : गेल्या पाच दिवसात संसदेचं कामकाज (Parliament work) केवळ 97 मिनिटेच चाललं आहे. विविध मुद्यांवरुन विरोधकांनी (Opposition) संसदेत केलेल्या गदारोळामुळे सातत्याने सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं. कालही (17 मार्च) विरोधकांनी उद्योगपती गौतम अदानींच्या (Gautam Adani) मुद्यावरुन संसदेत गदारोळ केला. त्यानंतर सभागृह तहकूब केलं. त्यानंतर संसदेचं कामकाज ठप्प झाल्यानंतर काँग्रेस खासदारांनी (Congress MP) संसद भवन संकुलातील गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, अद्याप 35 विधेयके प्रलंबित आहेत.

2008 नंतर प्रथमच सत्ताधाऱ्यांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज तहकूब

सत्ताधारी पक्षांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज तहकूब करण्याची 2008 नंतरची ही पहिलीच वेळ आहे. 2008 मध्ये सत्तेत सहभागी असलेल्या डाव्या पक्षांनी अमेरिकेसोबत झालेल्या अणुकराराबाबत बराच गदारोळ केला होता. त्यानंतर सरकारला सभागृहात विश्वासदर्शक ठराव घ्यावा लागला होता. समाजवादी पार्टीने त्यावेळी मनमोहन सिंह सरकारला बाहेरुन पाठिंबा दिला होता.

अदानी प्रकरणावरुन विरोधकांचा गोंधळ

मोदी सरकार (Modi Government) अदानी प्रकरणावरुन लोकांचे लक्ष हटवू इच्छित असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. याप्रकरणी विरोधकांना सभागृहात बोलू दिलं जात नाही. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली जात नसल्याचे काँग्रेसचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सभागृहात माफी मागावी यासाठी भाजप आग्रही आहे. यावरुन वेळोवेळी संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. पाच दिवसात केवळ 97 मिनिटेच सभागृहाचं कामकाज चाललं आहे.

पाच दिवसात लोकसभेचं कामकाज केवळ 42 मिनिटेच

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliament Budget Session)  दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरु झाला आहे. मात्र, गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज एक दिवसही पूर्ण होऊ शकले नाही. संसदेच्या या टप्प्यात 35 विधेयके प्रलंबित आहेत. गेल्या पाच दिवसांपासून सत्ताधारी पक्षाचे लोक संसदेचे कामकाज चालू देत नसल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केला आहे. गेल्या पाच दिवसात संसदेचं कामकाज 97 मिनिटे झालं आहे. यामध्ये लोकसभेचं कामकाज केवळ 42 मिनिटेच झाले आहे. लोकसभा टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार 13 मार्च रोजी 9 मिनिटं, 14 मार्चला 4 मिनिटं, 15 मार्चला 4 मिनिटं, 16 मार्चला 3.30 मिनिटं आणि 17 मार्चला फक्त 22 मिनिटं कामकाज झालं आहे.

राज्यसभेचं कामकाज 55 मिनिटे

तर गेल्या 5 दिवसांत राज्यसभेचे कामकाज 55 मिनिटे चालले. सभागृहातील रोजची कार्यवाही सरासरी 11 मिनिटे होती. 13 मार्च रोजी राज्यसभेचं कामकाज सर्वाधिक 21 मिनिटे चालले.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/3bl5pk4 Modi : 'संसद संवादाचं सक्षम माध्यम, जिथं खुल्या मनानं उत्तम चर्चा आवश्यक'; पंतप्रधान मोदींचं आवाहन

from india https://ift.tt/V1FcJoK
https://ift.tt/hspd4cg

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.