<a href="https://ift.tt/rEYG0M5 Pradesh Sidhi Accident : मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. भरधाव ट्रकने तीन बसला टक्कर दिल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात शुक्रवारी (24 फेब्रुवारी) भीषण अपघात झाला. एका भरधाव ट्रकने तीन बसला मागून धडक दिली. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रीवा पोलिसांनी माहिती देत सांगितलं की, या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून 50 जण जखमी झाले असून त्यापैकी 15-20 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मध्य प्रदेशातील रीवा आणि सिधी जिल्ह्याच्या सीमेवर हा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तीन बसला ट्रकने धडक दिली. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रीवा आणि सिद्धी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी रात्री उशिरा रेवा येथील संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी जखमींची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) February 24, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीनंतर लोक बसमध्ये चढत होते. अपघाताच्या वेळी बस रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
सतना येथे आयोजित कोल महाकुंभातील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमानंतर या बसेस परतत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सिधी जिल्ह्यातील मोहनिया बोगद्याजवळ घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना रीवा आणि सिधी येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 15 ते 20 लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
नाशिकच्या हरसूलजवळ लक्झरी बसला भीषण अपघात, तीसहून अधिक जखमी
from india https://ift.tt/8rgBDA1
https://ift.tt/8vKpOPG
Madhya Pradesh : अमित शाह यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या तीन बसला भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत आठ जणांचा मृत्यू तर 50 जखमी
February 24, 2023
0