Type Here to Get Search Results !

Heat Wave in India : फेब्रुवारीतच उष्णतेची लाट, 122 वर्षांचा विक्रम मोडला; सरासरी तापमान 29.5 डिग्री

Heat Wave in India : 2023 या वर्षाची सुरुवातच कडाक्याच्यी थंडीने झाली होती. जानेवारी महिन्यात आलेल्या थंडीमुळे अनेक वर्षांचा विक्रम मोडीत निघाला होता. यंदा  जास्त दिवस थंडीचे वातावरण राहिल असे वाटत होतं. पण असे झाले नाही.  जानेवारी संपता संपता उत्तर भारतामध्ये तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातील उष्णतेच्या लाटेनं सर्व विक्रम मोडीत काढले. फेब्रुवारी महिन्यात उष्णतेची लाट आली होती. फेब्रुवारी महिन्यातील तापमानाने 122 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. फेब्रुवारी महिन्यात सरासरी 29.5 डिग्री तापमान राहिले आहे. 1901 नंतर इतके तापमान पहिल्यांदाच राहिलेय.

यंदाचा उन्हाळाची तीव्रता जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अंगाची लाहीलाही होऊ शकते. राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मार्च ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. उत्तर कोकणात देखील मार्च ते मे महिन्यादरम्यान उष्णतेच्या लाटेचा अनुभव येणार, तापमान 40 अंशांपार जाण्याची शक्यता आहे.  मार्च महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. पण याची तीव्रता कमी असणार असे हवामान विभागाने सांगितलेय.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमान वाढून 29.5 डिग्री इतके राहिलेय. जे 1901 नंतर सर्वोत्तम आहे. फक्त दिल्लीबाबत बोलायचं झाल्यास, फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंतची सर्वात अधिक तापमानाची नोंद झाली आहे. ऋतू बदलतोय, आपण थंडीतून उन्हाळ्यात प्रवेश करतोय, काही काळाने हे लागणारे चटके कमी होतील आणि पुन्हा मार्च एप्रिलमध्ये आपल्याला उन्हाळा वाढल्याचे जाणवेल पण सध्याचे ऊन हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. 1951 ते 2023 पर्यंत सरासरी तापमान कसे राहिलेय पाहू...

1. 1960 : 27.9 डिग्री
2. 2006 : 29.7 डिग्री
3. 2023 : 27.7 डिग्री

आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना

मार्च महिन्यात देशातील अनेक भागातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.  यामध्ये ईशान्य भारतासह मध्य भारत आणि उत्तर भारताचाही समावेश आहे.  देशातील काही भागात सरासरी तापमानापेक्षा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना (अॅडवायजरी) जारी केल्या आहेत. संभाव्य उष्माघातासाठी काय करावे, काय करु नये, याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याशिवाय उष्णतेमुळे होणाऱ्या आजारासंदर्भातही माहिती दिली आहे.

उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आणि अति उष्णता असल्यानंतर जेवण तयार करु नका... विशेष करुन दुपारी 12 ते दुपारी तीन या दरम्यान घराबाहेर उन्हात जाऊ नका... त्याशिवाय तहान न लागली तरीही पाणी प्या... असे मार्गदर्शक सूचनामध्ये सांगण्यात आलेय. फेब्रुवारी महिन्यातील हे तापमान अल्पकाळासाठी वाढलेलं तापमान आहे.

काय करावे ?
ओरल रिहायड्रेशन सॉल्यूशन (ओआरएस) याचा वापर करा...  त्याशिवाय घरात तयार केलेले लिंबू-पाणी, छास, लस्सी, ज्यूस याचं जास्तीत जास्त सेवन करा.. घरातून दुपारच्या वेळी बाहेर येऊ नका..टरबूज, कलिंगड, संत्रा यासारख्या फळांचं सेवन करा. तसेच सुती कपडे परिधान करा.. गडद रंगाचे कपडे परिधान करु नका.. उन्हात जाताना डोकं झाका...

कुठल्या लक्षणांनंतर डॉक्टरकडे जावे?

तापमानामुळे होणारे त्रास
घसा कोरडा होणे
डोळ्यांची आग होणे
त्वचा लाल होणे
संसर्गजन्य त्रास
घसा धरणे
सर्दी होणे
ताप येणे
प्रचंड अंग दुखणे
ही लक्षणे असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणे महत्वाचे

काय काळजी घ्याल?

- उष्णतेच्या लाटेची चिन्हे आणि लक्षणे जाणून घ्या.
-हवामान अंदाजावर बारीक लक्ष ठेवा.
- पुरेसे पाणी प्या.
-सार्वजनिक आरोग्य सल्ल्यांबद्दल माहिती ठेवा.
- सनस्क्रीन आणि टोपी घाला.
- तुमचे घर हवेशीर ठेवा.
-अति उष्णतेमध्ये तुमच्या खिडक्या बंद ठेवा.
- अन्न आणि पाणी थंड ठिकाणी ठेवा.
-भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
-थंड, वातानुकूलित वातावरणात रहा.
-सैल-फिटिंग कपडे आणि सनस्क्रीन लावा.

from india https://ift.tt/rekV36S
https://ift.tt/B3zYWUO

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.