CM Bhagwant Mann : पंजाबचे शिक्षक (Teachers in Punjab) शिकवण्याशिवाय दुसरे कोणतेही काम करणार नसल्याचे वक्तव्य पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी केलं. निवडणूक आयोगानं (Election commission) नुकतेच आम्हाला जनगणनेसाठी 68 हजार शिक्षकांची मागणी केली होती. याबाबत आम्ही म्हणालो की, तुम्हाला शिक्षक दिले तर शिकवणार कोण? असा सवाल उपस्थित केल्याचे मान यांनी सांगितले. त्यामुळं जनगणनेच्या कामाला शिक्षकांना लावण्यास नकार दिल्याचे मान यांनी सांगितले.

Punjab Teachers : पंजाबचे 36 मुख्याध्यापक प्रशिक्षणासाठी गेले होते सिंगापूर

सिंगापूरमधील शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात पंजाबचे 36 मुख्याध्यापक सहभागी झाले होते. ते शनिवारी देशात परतले. त्या शिक्षकांनी देशाची राजधानी दिल्लीत आपले अनुभव सांगितले. या कार्यक्रमाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोस बैंस उपस्थित होते. यावेळी मान बोलत होते. दिल्ली आणि पंजाबच्या शिक्षण विभागाशी संबंधित उच्चपदस्थ अधिकारीही कार्यक्रमाला उपस्थित होते. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Singapore Education : सिंगापूरमध्ये शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व

शिक्षकांना सिंगापूर येथील प्रिन्सिपल अकॅडमी इंटरनॅशनल येथे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना पाच दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. जगातील विकसित देशांतील शिक्षक येथे प्रशिक्षणासाठी जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक आहेत. ज्यांना शैक्षणिक उपक्रमांचा व्यापक अनुभव आहे. या प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना स्थानिक शाळांना भेट देण्याचीही संधी मिळाली. सिंगापूरमध्ये शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. सिंगापूरचे शिक्षण क्षेत्रात खूप नाव आहे, त्यामुळं जगभरातून शिक्षक तिथे प्रशिक्षणासाठी जातात. सिंगापूरमध्ये शिक्षकांना स्वायत्तता आहे. तिथली प्रत्येक शाळा वेगळी असते. प्रत्येक शाळेची स्वतःची दृष्टी असते. तेथील काही शाळा AI च्या क्षेत्रातील शिक्षण देत आहेत.

CM Arvind Kejriwal : आमच्या सरकाराचं शिक्षणाला प्राधान्य

आत्तापर्यंत कोणत्याही राज्याने शिक्षकांना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवले नसल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. शिक्षकांना प्रशिक्षणासाठी पाठवून आमचं सरकार हाच संदेश देत आहे की शिक्षणाला आमचे प्राधान्य आहे. पंजाबचे शिक्षणमंत्री गेल्या वर्षभरात परदेशात गेले नाहीत, मात्र मुख्याध्यापकांनी परदेशातून प्रशिक्षण आणल्याचे मान म्हणाले. आता 36 मुख्याध्यापक गेले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

एकवेळ आमदार असो की दहावेळा, पेन्शन एकाच टर्मची मिळणार; पंजाबमध्ये भगवंत मान यांचा षटकार

from india https://ift.tt/5eczkn2
https://ift.tt/PufdtLX
CM Bhagwant Mann : पंजाबचे शिक्षक शिकवण्याशिवाय दुसरे काम करणार नाहीत: भगवंत मान
February 11, 2023
0