<a href="https://ift.tt/ZcGqFkH this day in history February 24 : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. प्रत्येक वर्षी 24 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक मुद्रण दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. त्याशिवाय 24 फेब्रुवारी हा दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

युक्रेन-रशिया युद्धाला एक वर्ष
युक्रेन-रशिया युद्धाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, युद्धविराम कधी होणार असा प्रश्न निर्माण झालाय. मागील एका वर्षातयुरोप आणि अमेरीकेकडून शस्त्रास्त्रांची मोठी मदत करण्यात आली आहे. पुढे देखील ती सुरुच राहिल. अशात हे युद्ध थांबणार तरी कधीअसा प्रश्न निर्माण झालाय. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन किव्हमध्ये पोहोचल्यानंतर मोठीआर्थिक मदत युक्रेनला रशियाविरोधात बायडेन यांनी देऊ केली आहे. त्यामुळे पुतीन यांनी देखील पश्चिमी देशांना लक्ष करत युद्ध सुरुचराहणार असल्याची गर्जना केली आहे.

24 February - जागतिक मुद्रण दिन (Printers’ Day)
प्रत्येक वर्षी 24 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक मुद्रण दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. मुद्रणकलेचे जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्मदिन 'जागतिक मुद्रण दिन' म्हणून साजरा केला जातो. गुटेनबर्ग ह्यांनी मुद्रण कलेचा शोध लावला म्हणून आज आपण वैचारिक दृष्टया समृद्ध आहोत. मुद्रण कलेच्या शोधामुळेच आज आपण वैचारिकदृष्ट्या समृद्ध आहोत. आज आपण सोशल मीडिया क्षेत्रात केलेली प्रगतीही मुद्रण कलेचा उत्तम नमुना आहे.

केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस

प्रत्येकवर्षी देशभरात 24 फेब्रुवारी हा दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. केंद्रीय उत्पादन आणि कस्टम बोर्ड ऑफ इंडियाचं अर्थव्यवस्थेतील योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस केंद्रीय उत्पादन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याशिवाय लोकांना केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुक्ल बोर्डाचे महत्व समजावून सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 24 फेब्रुवारी 1944 रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा अंमलात आणला होता.

छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्म -

छत्रपती शिवाजी महाराज यांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजगडावर झाला होता. 1689 ते 1700 पर्यंत राजाराम यांनी राज्य केले. राजाराम महाराज यांनी अकरा वर्ष राज्य केले. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत मुघलांशी सतत मतभेद होते. त्यांची विधवा पत्नी ताराबाई यांच्या राजवटीत, त्यांचा तान्हा मुलगा शिवाजी महाराज दुसरा हे गादीवर आले.

सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. 1695 साली शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले आहे.

कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात
24 फेब्रुवारी 1952 पासून कर्मचारी राज्य विमा योजनेला सुरुवात झाली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. कामावर असताना कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या आश्रितांस ठराविक दराने विवक्षित काळासाठी रोख मदतही दिली जाते. योजनेत समाविष्ट होणाऱ्या कामगारांना वैद्यकीय मदत आणि उपचारही उपलब्ध असतात. ही मदत योजनेखालील दवाखान्यांत किंवा विमा योजनेखालील अधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांकडे मिळू शकते.

तामिळनाडूचं नामाकरण -

आजच्याच दिवशी 1961 मध्ये मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्यात आले आहे. मद्रास हे नाव इंग्राजामुळे भारतात रुजले होते. भारतात पाय रोवल्यानंतर 1639 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने जमीन खरेदी करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास पोर्ट आणि फोर्ट सेंट जॉर्ज, सेंट मेरीज चर्च तयार केले. मदर मेरी मुळे इंग्रज त्या ठिकाणाला मद्रास म्हणत होते. भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकापाठोपाठ एक नाव बदलण्यास सुरुवात केली होती. बॉब्मेचं नामकरण मुंबई असं करण्यात आले. त्यानंतर मद्रासचं नाव बदलून तामिळनाडू असे करण्यात आले.

वनडेत द्विशतक झळकावणारा सचिन पहिला -

वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत बऱ्याच क्रिकेटपटूंनी द्विशतक झळकावले आहे. पण वनडेमध्ये पहिलं द्विशतक झळकावण्याचा मान सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये वनडेत द्विशतक झळकावले होते. एकदिवसीय सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजामध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे. एकट्या रोहित शर्माच्या नावावर तीन द्विशतकं आहेत. त्याशिवाय वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, इशान किशन आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा द्विशतकांची नोंद झाली आहे. त्यापैकी सात द्विशतकं भारतीय खेळाडूंच्या नावावर आहेत. तर वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी एका फलंदाजानं द्विशतक झळकावलं आहे.

जयललिता यांचा जन्म -

देशाच्या आणि तामिळनाडूच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणाऱ्या एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा, तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि सर्वांच्या लाडक्या ‘अम्मा’ यांचा यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. 24 फेब्रुवारी 1848 रोजी मेलूकोटे येथे तमिळ अय्यंगार कुटुंबात जयललिता यांचा जन्म झाला होता. त्याचे वडील जयराम हे पेशाने वकील होते. जयललिता दोन वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांना गमावले होते. कन्नड, तमिल,इंग्रजी आणि हिंदी भाषेतील सुमारे 300 चित्रपटात त्यांनी काम केले. ‘चिन्नाडा गोम्बे’ हा कन्नड भाषेतील त्यांचा पहिला चित्रपट होता. 1982 मध्ये जयललिता यांनी एमजी.रामचंद्रन यांच्या नेतृत्वाखालील अन्ना द्रमुकमध्ये प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली. त्यांच्यावर पक्षाच्या प्रचार सचिवाची जबाबदारी सोपविण्यात आली. नंतर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत त्या विजयी झाल्या आणि त्यांच्या संसदीय राजकारणाला सुरुवात झाली. त्यानंतर 1984 ते 1989 दरम्यान त्या राज्यसभेवर निवडून गेल्या. जयललीता यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. 1991 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन तामिळनाडूतील सर्वात कमी वयाच्या त्या मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांनी मिळविला.

स्टिव्ह जॉब्ज -

स्टिव्ह जॉब्ज यांचा 24 फेब्रुवारी 1955 रोजी दिवशी जन्म झाला होता. जगभरात संगणक आणि मोबाईलच्या क्षेत्रात क्रांती आणण्याच्या कार्यात अग्रेसर असणारे आणि अॅपलचे संस्थापक स्टिव्ह जॉब्ज यांचे 5 ऑक्टोबर 2011 रोजी निधन झालं. जिद्द आणि मेहनतीच्या जीवावर स्टिव्ह जॉब्जने जगभराच्या मार्केटला नवी दिशा दिली. स्टिव्ह जॉब्ज यांनी अॅपल ही कंपनी सुरु केली होती, ती आज जगातली सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale -
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1966 रोजी झाला होता. महाराष्ट्रातील जनता आजही त्यांच्याकडे छत्रपती म्हणूनच पहाते व त्याप्रमाणे आदर देते. सध्या ते भजापचे राज्यसभा खासदार आहेत. राष्ट्रवादीकडून लोकसभेचे खासदार राहिले आहेत.

1972 : भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शक पूजा भट्ट यांचा जन्म.

1994 : सैराट फेम मराठी अभिनेता आकाश ठोसर याचा जन्म.

1963 : भारतीय चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा जन्म.

1998 : ललिता पवार यांचं निधन
मराठी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार यांचे आजच्याच दिवशी पुण्यात निधन झाले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली होती. नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार यासारख्या चित्रपटांमध्ये कामे केली होती.

1815 : रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म
अमेरिकन अभियंते व संशोधक रॉबर्ट फुल्टन यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले. पाणतीराचा (torpedo) शोधही त्यांनीच लावला. मराठीशिवाय हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या अनेक भूमिका प्रसिद्ध झाल्या होत्या. श्री 420, अनाडी, जंगली, बहूरानी यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत.

श्रीदेवी यांचं निधन -
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. 24 फेब्रुवारी रोजी 2018 वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी दुबईत कार्डिअॅक अरेस्टने त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आज जरी या जगात नसली, तरी ती चाहत्यांच्या हृदयात नेहमीच जिवंत राहिली आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला होता. आपल्या यशस्वी कारकिर्दीत श्रीदेवीने हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि प्रेक्षकांच्या हृदयात आपली हक्काची जागा निर्माण केली. श्रीदेवीचे खरे नाव ‘श्री अम्मा यंगर अय्यपन’ आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली लेडी सुपरस्टार म्हटल्या जाणार्‍या श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून 'कंधन करुणाई' या तमिळ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1971मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपट ‘पूमबट्टा’साठी श्रीदेवीला केरळ राज्य चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. या काळात श्रीदेवीने अनेक तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. ‘रानी मेरा नाम’ या 1972मध्ये आलेल्या चित्रपटाद्वारे श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

from india https://ift.tt/8fMEp63
https://ift.tt/8vKpOPG
युक्रेन-रशिया युद्धाला एक वर्ष, जागतिक मुद्रण दिवस; इतिहासात आज
February 23, 2023
0