मुंबई : या पुढे कोणलाही रिअल इस्टेट एजंट (Real Estate Agent) बनता येणार नाही. रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी यापुढे महारेराची ( RERA ) परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. ही परीक्षा पास झाल्यावरच व्यवसायाचा परवाना मिळणार आहे. 1 मे 2023 पासून महारेराच्या या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

रिअल इस्टेट एजंट हे राज्यातील मालमत्ता शोधणारे आणि मालक यांच्यातील मध्यस्थ म्हणून ओळखले जातात. या रिअल इस्टेट एजंटना आता परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्र रेराने नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. RERA ने म्हटले आहे की, जो या परीक्षेत उत्तीर्ण होईल तो अधिकृतपणे एजंट म्हणून काम करू शकेल. महाराष्ट्रात सध्या 37,746 प्रॉपर्टी एजंट आहेत. या प्रॉपर्टी एजंटसाठी परीक्षा देणे आता बंधनकारक आहे.

महारेराने रिअल इस्टेट एजंटना प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर केली आहे. एका परिपत्रकाच्या माध्यमातून या योजनेची माहिती देण्यात आली आहे. रेराचा नियम लागू झाल्यानंतर प्राधिकरण केवळ वैध योग्यता प्रमाणपत्र असलेल्या एजंटनाच त्याच्या पोर्टलवर अधिकृत रिअल इस्टेट एजंट म्हणून नोंदणी करण्याची परवानगी देणार आहे.

रेराने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, रिअल इस्टेट एजंट हे प्रवर्तक आणि घर खरेदीदार यांच्यातील मध्यस्थ आहेत. त्यामुळे त्यांना नियामक फ्रेमवर्कच्या ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

"रिअल इस्टेट एजंट्सच्या कार्यपद्धतींमध्ये विशिष्ट स्तरावर सुसंगतता आणण्यासाठी, नियामक आणि कायदेशीर फ्रेमवर्क आणि पद्धतींचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यासाठी आचारसंहितेची अंमलबजावणी आणि रिअल इस्टेट एजंट व्यावसायिकदृष्ट्या पात्र आहेत याची खात्री करण्यासाठी MahaRERA ने संपूर्ण महाराष्ट्रात रिअल इस्टेट एजंटसाठी मूलभूत रिअल इस्टेट एजंट प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना जाहीर केले आहे.

प्राधिकरणाने गेल्या दोन वर्षांमध्ये रिअल इस्टेट एजंट प्रशिक्षणासाठी मूलभूत अभ्यासक्रम विकसित केला आहे. त्यानुसार येत्या फेब्रुवारी महिन्यापासून पॅनेल केलेले प्रशिक्षण प्रदाते ऑनलाइन, ऑफलाइन आणि हायब्रिड स्वरूपात प्रशिक्षण देतील. ही परीक्षा उर्तीर्ण झाल्यानंतरच एदिकृतपणे एजंट म्हणून काम करता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/i48uZAj Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी कोण होणार? हे पैलवान फायनलच्या शर्यतीत

धक्कादायक! मृत्यूची नोंद करण्यासाठी मागितली 600 रुपयांची लाच, ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

from india https://ift.tt/ahFxfP5
https://ift.tt/jAoVY5p
आता कोणलाही रिअल इस्टेट एजंट बनता येणार नाही, उत्तीर्ण व्हावी लागेल परीक्षा
January 13, 2023
0