<p> प्रजासत्ताक दिनी विजयपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दरवर्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. पण यंदा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे. कारण चित्ररथांच्या अंतिम निवडीसाठी १४ राज्यांना आमंत्रण देण्यात आलंय आणि त्या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही. राज्यांची संख्या अधिक असल्यामुळं दरवेळी ठराविक संख्येतच काही राज्यांच्या चित्ररथांची निवड होत असते. यंदा महाराष्ट्रानं साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्यासह आठ वेगवेगळे प्रस्ताव दिले होते. पण रोटेशन पद्धतीनं राज्यांची निवड होत असल्यामुळं महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा प्रजासत्ताक दिन संचलनाची संधी नसणार आहे. याआधी २०२० सालीही महाराष्ट्राचा चित्ररथ संचलनात सहभागी झाला नव्हता. </p>
from india https://ift.tt/jexaNOP
https://ift.tt/dSU50pm
Republic Day : प्रजासत्ताक दिनी विजयपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार
December 20, 2022
0