Type Here to Get Search Results !

Nasal Vaccine : नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस CoWin ॲपवर उपलब्ध, बुकींग कधी सुरु होणार?

<a href="https://ift.tt/5Bcxp3q Biotech Nasal Vaccine : भारत बायोटेकची (Bharat Biotech) नाकावाटे देण्यात येणारी लस (Covid Nasal Vaccine) आता कोविन (CoWin) ॲपवर उपलब्ध आहे. भारत बायोटेकची iNCOVACC या इंट्रानेझल कोविड-19 लसीचा पर्याय शनिवारी संध्याकाळीपासून कोविन ॲपवर (CoWin App) उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दरम्यान कंपनीकडून अद्याप लसीची किंमत आणि वापरासाठी उपलब्धता जाहीर करण्यात आलेली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे. भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला बूस्टर डोस (Booster Dose) म्हणून वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीच्या नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजेच नाकावाटे घेण्यात येणाऱ्या लसीच्या आपात्कालीन वापराला आरोग्य तज्ज्ञांच्या समितीने मंजुरी दिली. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत दिली होती. त्याआधी DGCI ने ही लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.

भारत बायोटेक कंपनीच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला बूस्टर डोस म्हणून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिली. भारत बायोटेकची इंट्रानेझल कोविड लसीचा पर्याय कोविन ॲपवरही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच ही नेझल कोरोनो वॅक्सिन खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. या लसीचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्यात येईल. 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील लोकांना नेझल कोरोना वॅक्सिनचा बूस्टर डोस घेता येईल. आधी ही लस खाजगी लसीकरण केंद्रवर उपलब्ध होईल.

Govt of India approves Nasal vaccine. It will be used as a heterologous booster & will be available first in private hospitals. It will be included in #COVID19 vaccination program from today: Official Sources pic.twitter.com/eaxVoX2Hp9
— ANI (@ANI) December 23, 2022

नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजे काय? (What is Nasal Corona Vaccine?)

नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजे नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस आहे. यासाठी तुम्हाला इंजेक्शन घेण्याची गरज नाही. नाकाद्वारे या लसीचा डोस दिला जातो. ही लस त्वचेतून शरीरात प्रवेश करते आणि विषाणूविरोधात रोगप्रतिकार शक्ती निर्माण करते. या लसीला इंट्रानेझल वॅक्सिन असेही म्हणतात. नाकावाटे देण्यात येणारी ही लस इंजेक्शनला पर्याय म्हणून वापरली जाणार आहे. विशेषत: लहान मुले किंवा वृद्ध ज्यांना ट्रायपॅनाफोबिया आहे, म्हणजेच सुयांची भीती वाटते. अशा लोकांसाठी नेझल कोरोना वॅक्सिन उत्तम पर्याय आहे.

from india https://ift.tt/USfTIhs
https://ift.tt/oarEbnZ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.