INS Mormugao : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे अत्याधुनिक स्टेल्थ गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर मुरमुगाव (INS Mormugao) भारतीय नौदलात दाखल करतील. हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या (China) वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS मुरमुगाव रविवारी (18 डिसेंबर) भारतीय नौदलात सामील करण्यात येणार आहे. भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार, ही युद्धनौका रिमोट सेन्सर मशीन, आधुनिक रडार आणि पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तसेच जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यासारख्या शस्त्र प्रणालींनी सुसज्ज आहे.

2025 पर्यंत आणखी दोन युद्धनौका
नौदलाच्या प्रकल्प-15B अंतर्गत मुरमुगाव ही दुसरी युद्धनौका आहे, ज्याअंतर्गत 2025 पर्यंत आणखी दोन युद्धनौका देण्यात येणार आहेत. नौदलाच्या आधुनिकीकरणाशी परिचित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिली P-15B युद्धनौका गेल्या नोव्हेंबरमध्ये मुंबईत कार्यान्वित झाली. विशाखापट्टणम-क्लास डिस्ट्रॉयर्सची रचना ही नौदलाची इन-हाउस संस्था वॉरशिप डिझाईन ब्युरोने केली आहे.

प्राणघातक युद्धनौकांमध्ये याची गणना
नौदलाने सांगितले की, या युद्धनौकेची लांबी 163 मीटर, रुंदी 17 मीटर आणि वजन 7,400 टन आहे. भारतात बांधलेल्या सर्वात प्राणघातक युद्धनौकांमध्ये याची गणना केली जाऊ शकते.

मुरमुगाव नाव कसे पडले?
गोव्याच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेल्या मुरमुगाव या ऐतिहासिक बंदर शहरावरून हे नाव पडले आहे. हे जहाज प्रथम 19 डिसेंबर 2021 रोजी समुद्रात उतरले, त्याच दिवशी गोव्याने पोर्तुगीज राजवटीपासून मुक्तीची 60 वर्षे पूर्ण केली. ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या स्वदेशी संस्थेने डिझाइन केले आहे.

75% पूर्णपणे स्वदेशी
ही युद्धनौका चार शक्तिशाली गॅस टर्बाइनद्वारे चालविली जाते. 30 नॉट्सपेक्षा जास्त वेग गाठण्यास सक्षम आहे. नौदलाने सांगितले की, या जहाजाची पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता विकसित करण्यात आली असून यावर रॉकेट लाँचर, टॉर्पेडो लाँचर्स आणि एसएडब्ल्यू हेलिकॉप्टर बसवण्यात आले आहेत. हे जहाज आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्धाच्या परिस्थितीत लढण्यास सक्षम आहे. नौदलाने सांगितले की, या जहाजाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सुमारे 75 टक्के हे पूर्णपणे स्वदेशी आहे. तसेच ते 'आत्मनिर्भर भारत' या राष्ट्रीय उद्दिष्टाखाली तयार करण्यात आले आहे.

एकूण 35,800 कोटी रुपये खर्च
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर् नुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, नौदलामध्ये या जहाजाचा समावेश केल्याने हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षितेत वाढ होईल, तसेच नौदलाच्या ब्लू-वॉटर क्षमतेला चालना मिळेल. या जहाजाच्या निर्मितीसाठी एकूण 35,800 कोटी रुपये खर्च आला आहे. प्रकल्प-15B अंतर्गत MDL (माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड) येथे बांधण्यात येणाऱ्या 4 विशाखापट्टणम श्रेणीतील विनाशकांपैकी मुरमुगाव हे दुसरे विनाशक आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयएनएस विशाखापट्टणम या नावाने अशा प्रकारचे पहिले विनाशक नौदलात दाखल झाले होते.

from india https://ift.tt/Kv4T7Iz
https://ift.tt/wuCdFBU
INS Mormugao : नौदलात सामील होणार शक्तिशाली INS मुरमुगाव! आधुनिक युद्धनौकाची वैशिष्ट्ये जाणून घ्या
December 16, 2022
0