Telangana Viral Video : तेलंगणातील (Telangana) राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यात मंगळवारी सकाळी एका 18 वर्षीय तरुणीचे चार जणांच्या टोळीने जबरदस्तीने कारमधून अपहरण केले. ही घटना जिल्ह्यातील चंदुर्थी मंडलातील मुडेपल्ले गावात पहाटे 5.30 च्या सुमारास घडली. महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि तिचे वडील मंदिराकडे जात होते. तेव्हा ही घटना सीसीटीव्हीत कैद (CCTV) झाली आहे. अपहरणकर्त्यांनी तरुणीला बळजबरीने आपल्या कारमध्ये बसवून तेथून पळ काढल्याचे दिसून येत आहे. स्थानिक टीव्ही चॅनेल्सने प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये (Viral Video) मुलीचे वडील तिला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Unidentified men kidnapped an 18-year-old girl in #Telangana's Rajanna Sircilla district and a video of the incident captured on CCTV has gone viral on social media.

The incident occurred in Moodepalle village of Chandurthi mandal. pic.twitter.com/v1JDrgO68l
— IANS (@ians_india) December 20, 2022

घटना सीसीटीव्हीत कैद
ही घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ज्यामध्ये कारमध्ये आलेले काही तरुण मुलीचे अपहरण करताना दिसत आहेत. अवघ्या 23 सेकंदात ही घटना घडली असून पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये हे तरुण आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान काही लोक गाडीतून खाली उतरतात. तेव्हा वडिलांसोबत जात असलेल्या एका मुलीला त्यातील एका तरुणाने पकडून कारमध्ये बसवल्याचे दिसून आले.

तरुणीचे लग्न निश्चित झाल्याचे तरुणाला समजले
या टोळीने आपल्या मुलीला पळवून नेण्यापूर्वी मारहाण केल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यातील एक आरोपी मुलीच्या गावातील असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी 24 वर्षीय संशयित या तरुणीसोबत पळून गेला होता, मात्र पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले आणि तरुणीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, आरोपीला समजले होते की, या तरुणीचे लग्न कोणा एका व्यक्तीसोबत निश्चित झाले आहे, त्यानंतर त्याने आपल्या मित्रांसह तिच्या अपहरणाचा कट रचला. यानंतर आरोपीला पकडण्यासाठी तसेच मुलीच्या सुटकेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली. या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलगी वडिलांसोबत मंदिरातून घरी परतत होती
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी एका मंदिरातून घरी परतत होती. मात्र, मुलीच्या वडिलांना काही समजण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळ काढला. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी वाहनाचा पाठलाग केला, मात्र कार भरधाव वेगाने जात असल्याने त्यांना काहीच करता आले नाही. सीसीटीव्हीत कैद झालेल्या पांढऱ्या रंगाच्या कारला नंबर प्लेटही नव्हती.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला
मुलीच्या अपहरणावर वेमुलवाडा डीएसपी नागेंद्र म्हणाले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही त्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या घटनेत 4 जणांचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी सध्या 3 पथके तयार करण्यात आली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/IVOstKM Video: पायलट आहे की शायर....या खास शैलीतील अनाऊन्समेंट ऐकून तुम्ही देखील व्हाल खूश; पाहा व्हिडीओ

from india https://ift.tt/p82aVne
https://ift.tt/dSU50pm
Crime : वडिलांच्या डोळ्यादेखतच तरुणीचे प्रियकराकडून अपहरण, जबरदस्तीने कारमध्ये बसवले, घटना सीसीटीव्हीत कैद
December 20, 2022
0