Type Here to Get Search Results !
देशासाठी प्राण द्यायलाही तयार... काश्मीरवरील डिबेटमध्ये पाकिस्तानची 'धुलाई' करणारी याना मीर कोण आहे?
मुंबई : गेल्या 24 तासांत ट्विटरवर व्हायरल झालेली काश्मीरवरील चर्चा तुम्ही ऐकली असेल. यामध्ये एका तडफदार काश्मिरी महिला पत्रकाराने काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानी एक्सपर्टला चांगलाच घाम फोडलाय. फाळणीनंतर काश्मीर मिळवण्याच्या इच्छेने दुबळे होत चाललेले पाकिस्तानचे राज्यकर्ते प्रत्येक जागतिक व्यासपीठावर हा मुद्दा मांडत राहतात. मात्र एका काश्मिरी पत्रकाराने पाकिस्तानच्या या इच्छेला असे प्रत्युत्तर दिले की, संपूर्ण भारतातून या महिला पत्रकाराचे कौतुक होत आहे. याना मीर असं या महिला पत्रकाराचं (Kashmiri journalist Yana Mir) नाव आहे.
रविवारी संध्याकाळपर्यंत ट्विटरवर #yanamir ट्रेंड झाला. अनेक माजी लष्करी अधिकाऱ्यांनी या डिबेटचा व्हिडीओ शेअर केला आणि याना मीरच्या युक्तिवादाचे कौतुक केले. निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी व्हिडीओ शेअर करत याना मीर यांचं कौतुक केलंय. "काश्मीरची कहाणी पाकिस्तानी वाहिनीवर पाकिस्तानला सहज समजावून सांगितली. डिबेटमधील शेवटची ओळ भविष्यातील वास्तव आहे, असे कौतुक दुआ यांनी केले आहे. "पाकिस्तानच्या या कारवाईमुळे आता पीओके घेण्याची चर्चा सुरू झाली आहे, असे याना मीर यांनी शेवटी म्हटले आहे. या डिबेटनंतर आता गुगलवर याना मीर कोण आहेत याबाबत सर्च केले जात आहे.
Kashmiri journalist Yana Mir :  कोण आहेत याना मीर?
याना मीर अनेक माध्यमांसाठी लिखान करतात. त्या एक सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. एका वेबसाइटवरील त्यांच्या प्रोफाइलमध्ये लिहिले आहे की, याना मीर या काश्मीरची पहिली महिला YouTube व्लॉगर आहे, जी काश्मीरचे राजकीय वास्तव शून्यातून समोर आणते. त्या ऑल यूके युथ सोसायटीच्या उपाध्यक्षा आहेत. ही एक सामाजिक संस्था आहे, जी काश्मीर खोऱ्यातील तरुण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करते.
Kashmiri journalist Yana Mir :  याना मीर यांचा व्हायरल व्हिडिओ
याना मीर या हिंदी आणि इंग्रजी अस्खलितपणे बोलतात. अमेरिकेत जेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल झरदारी यांनी पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द वापरले, तेव्हा त्यांनी एक व्हिडिओ शेअर करून पाकिस्तानला खडे बोल सुनावले. युनायटेड नेशन्सच्या अध्यक्षांना उद्देशून एका व्हिडीओमध्ये याना मीर म्हणाल्या की, एक भारतीय मुस्लिम म्हणून मी तुम्हाला खात्री देते की, आम्ही 39 दशलक्ष आहोत, जे लोकसंख्येच्या 20 टक्के आहोत.
from india https://ift.tt/HRjN45f
https://ift.tt/V3ZSbrk
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.